हर हर महादेव च्या जयघोषाने दुमदुमले श्रीक्षेत्र कामठेश्वर शिव मंदिर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कोलार , कन्हान आणि पेंच या तीन नदीच्या त्रिवेणी संगमावर 337 वर्षापूर्वीचे वसलेले जुनी कामठी चे श्रीक्षेत्र कामठेश्वर शिव मंदिर आज 8 मार्चला महाशिवरात्रीच्या पर्वनिमित्त श्रद्धाळू भक्तभाविकांच्या हर हर महादेवाच्या जयघोषाने चांगलेच दुमदुमले.

महाशिवरात्री पर्वानिमित्त जुनी कामठी स्थित मानवता चे प्रतीक व अति प्राचीन कामनापूर्णश्रीक्षेत्र कामठेशवर शिव मंदिरात कामठी शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसह इतर Cठिकानातील भाविकांनी एकच गर्दी केली होती. पहाटे 4 वाजता भगवान श्री कामठेशवर महादेव यांचा अभिषेक करून पूजा अर्चना करण्यात आली. तर मंदिरात दर्शनार्थ माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे तसेच आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.याप्रसंगी मंदिर समितीचे अध्यक्ष जिजा आसोले,प्रकाश हिरणवार,छावणी परिषद चे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर लांजेवार, दिपक सीरिया,प्रकाश सीरिया, लाला खंडेलवाल,छावणी परिषद चे मनोनीत सदस्य कमल उर्फ लालू यादव,विक्रम लांजेवार,विजय लांजेवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

मंदिरात दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांसाठी विविध मार्गावर विविध सामाजिक, धार्मिक संघटना तसेच मंदिर कमिटी च्या वतीने ठिकठिकाणी भव्य महाप्रसाद तसेच शरबत वितरण करण्यात आले होते..भाविकांच्या सुरक्षात्मक दृष्टिकोनातून जुनी कामठी पोलीस स्टेशन तसेच कन्हान पोलीसांचा चोख बंदोबस्त लावलेला असून दुर्घटनेला आळा बसावा यासाठी नदीकाठी तसेच मंदिर परिसरात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते..तसेच आजच्या दिवशी भाविकांना सोयीचे व्हावे यासाठी कामठी छावणी परिषद चे भाजी मंडी गेट, गरूड गेट,वारेगाव बाह्य वळण मार्ग गेट पूर्णतः उघडे ठेवले होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शिव मंदिर देवस्थान समिती जुनी कामठी च्या मनोनीत अध्यक्षा राजमाता इंदीराराजे लक्ष्मणसिंह भोसले,अध्यक्ष जिजा आसोले,उपाध्यक्ष बाबूलाल हिरणवार,उपाध्यक्ष प्रकाश सीरिया,कोशाध्यक्ष अनिल गंडालिया,सचिव राजेश ऊर्फ लाला खंडेलवाल,सहसचिव श्रीराम कुशवाहा,सदस्य युगचंद छल्लानी,प्रकाश हिरणवार, उत्तम नायरे, सोनू पिल्ले,विजय लांजेवार, भूषण इंगोले, विधी सलाहकार ऍड गजानन आसोले यासह जुनी कामठी पोलीस स्टेशन तसेच कन्हान पोलिसांनी मोलाची भूमिका साकारली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष (शरद पवार) नागपुर जिल्हा कार्याध्यक्षपदी किशोर बेलसरे यांची नियुक्ती

Sat Mar 9 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- नागपूर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) ग्रामीण कार्यकर्ते च्या विनंती वरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख व माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या शिफारिशीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनुभवी, तडफदार, पक्षनिष्ठ कूशल संघटक रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे यांची नागपुर जिल्हा (ग्रामीण) कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती बद्दल शरद पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!