कोदामेंढी :- दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील श्री गजानन भजन पारायण मंडळ तथा भक्त परिवार तर्फे श्री च्या पायी पालखी सोहळा रविवार दिनांक 20 ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे .श्री राधाकृष्ण विठ्ठल रखुमाई सार्वजनिक देवस्थान येथून सकाळी ठीक सहा वाजता आरती व ठीक सात वाजता पालखी प्रस्थान होणार आहे. श्रींच्या पायी पालखी जाण्याच्या मार्ग भांडेवाडी -अरोली- खापरखेडा -पारडी -निमखेडा मार्गे श्री संत गजानन महाराज मंदिर तारसा येथे सायंकाळी चार वाजता पोहोचून महाआरतीनंतर महाप्रसादाने सांगता होणार आहे. शेगावची भक्तिगंगा ते तारसा श्री चे मंदिर एकूण अंतर 16 किलोमीटर असून या पालखी सोहळ्याच्या लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.