– कोराडीच्या महालक्ष्मी मंदिरात गुरुपौर्णिमा कार्यक्रमा ला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर :- श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी मंदिर येथे रविवारी 21 जुलै रोजी लायन्स क्लब नागपूर आयुर्वेद तर्फे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी जिल्हा गव्हर्नर एम.जे.एफ. राजेंद्र मिश्रा, प्रदेश अध्यक्ष एम.जे.एफ.डॉ.पार्वती राणे, झोन सभापती एम.जे.एफ, लायन्स क्लब नागपूर आयुर्वेदच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी थटेरे यांनी सर्वांचे स्वागत केले व गुरुपौर्णिमा कार्यक्रमाची संकल्पना व पार्श्वभूमी याबाबतीत सविस्तर माहिती दिली. गुरुपौर्णिमे निमित्त जगदंबा संस्थान कोराडी मंदिराच्या पुजाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. त्यापैकी केशव महाराज, अशोक महाराज, राजू महाराज, गुप्ताजी, बाबूलाल परिहार, शोभेलालजी, दिलीप बांगरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आयुर्वेद गुरू डॉ.वेदप्रकाश शर्मा, डॉ.श्रीराम ज्योतिषी यांचा लायन्स क्लब नागपूर आयुर्वेद तर्फे गुरुपौर्णिमा निमित्त सत्कार करण्यात आला.
आयुर्वेदाचे ज्येष्ठ सदस्य डॉ. किरण तिवारी, डॉ.सुरेश खानोरकर, डॉ.मंगेश भलमे, डॉ.संजय थटेरे यांचा सत्कार करण्यात आला. लायन्स क्लब नागपूर आयुर्वेदनेही क्लब सदस्यांच्या पालकांचे स्वागत केले. यामध्ये मालिनी शिवणकर, ममता नवलकर, दशरु मरकम, कांतीबाई मरकाम, डॉ. रमेश बारस्कर आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी आचार्य डॉ.वेदप्रकाश शर्मा, डॉ.श्रीराम ज्योतिषी यांनी गुरुपौर्णिमा उत्सवा विषयी मनोगत व्यक्त केले. धनंजय ठोंबरे यांनी गुरुपौर्णिमा उत्सवाबाबत मनोगत व्यक्त केले. संचालन डॉ.संजय थटेरे यांनी तर आभार सचिव डॉ.प्रशांत गणोरकर यांनी मानले. लायन्स क्लब नागपूर आयुर्वेद च्यावतीने कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपण व मंदिरातील महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे वाटप केले. याप्रसंगी लायन्स क्लब नागपूर आयुर्वेदचे सदस्य व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब नागपूर आयुर्वेदच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. प्रकल्प अधिकारी डॉ.संजय थटेरे यांनी माहिती दिली.