श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

नवी दिल्ली :- श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी आज (21 जुलै, 2023) नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

राष्ट्रपती विक्रमसिंघे यांचे भारतात स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारताच्या ‘शेजारी प्रथम ‘ धोरणात आणि सागर (Security and Growth of All in the Region) दृष्टिकोनामध्ये श्रीलंकेला विशेष स्थान आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, गेल्या एका वर्षात श्रीलंकेला आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारताने दिलेला बहुआयामी पाठिंबा हा श्रीलंकेसोबतच्या द्विपक्षीय संबंधांसाठी भारताच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचा दाखला आहे. श्रीलंकेच्या गरजेच्या वेळी भारत नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि भविष्यातही भारत असाच पाठिंबा आणि मदत करत राहील यावर त्यांनी भर दिला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आमची भागीदारी दोन्ही देशांच्या सामान्य लोकांसाठी आणि हिंद महासागर क्षेत्रासाठी चिरस्थायी आणि लाभदायक आहे.

भारत आणि श्रीलंका अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहेत आणि भारत-श्रीलंका विकासात्मक भागीदारीमुळे श्रीलंकेच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला असल्याचे दोन्ही नेत्यांनी नमूद केले.

राष्ट्रपती विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेसोबतची विकासासंबंधित भागीदारी सुरू ठेवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उद्यापासुन " सुंदर माझे उद्यान व ओपन स्पेस " स्पर्धा, स्पर्धेत ६० संघ सहभागी

Sat Jul 22 , 2023
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकच लक्ष शहर स्वच्छ मोहीमेअंतर्गत शहरातील नागरिकांचे आपल्या शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणात योगदान असावे या दृष्टीने ” सुंदर माझे उद्यान ” व ” सुदंर माझी ओपन स्पेस ” या २ स्वतंत्र स्पर्धा २३ जुलै ते २३ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येत असुन सर्व संघांसाठी मार्गदर्शपर बैठक आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली २२ जुलै रोजी मनपा सभागृहात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com