संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी शहरात डेंग्यूसदृश्य परिस्थितीवर नियंत्रण साधण्यासाठी नगर परिषद च्या वतीने उपाययोजना करण्याची ,ब्लिचिंग पावडर मारणे,धूळ फवारणी करण्यासह फॉगिंग मशीनचा वापर करण्याची मागणी शहरवासियातुन करण्यात येत होती.यावर मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी या मागणीला गांभीर्याने लक्षात घेत कामठी शहरातील प्रभागात ब्लिचिंग पावडर मारणे, फॉगिंग मशीन फवारणी करणे यासारख्या प्रतिबंधक उपाययोजनावर भर दिला व प्रभागात फॉगिंग मशीन ने फवारणी करणे सुरू केले.
सर्दी,खोकला,ताप ,अंग दुखणे या आजाराने नागरिक त्रस्त असून डेंग्यूचा प्रकोप पसरत आहे तसेच घरी व घराशेजारी साठून असलेल्या पाण्यामुळे डेंग्यूचे मच्छर तयार होत आहेत तेव्हा नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी संदीप बोरकर करीत असून नागरिकांनी स्वच्छता बाळगावी, पाणी साचून ठेवू नये,नागरिकांनी घरातील कुलर,ड्रम, भांडी कुंडी आदींसह जिथे चार दिवस पाणी साचून राहते तेथे पाणी न साचविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.डेंग्यूचे मच्छर हे शुद्ध साचलेल्या पाण्यात तयार होत असल्याने नागरिकांनी घरात कोठेही पाणी साचून ठेवू नये तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.