गडचिरोली :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली द्वारा आयोजित क्रीडा सप्ताह 2024-25 क्रीडा संस्कृतीची जोपासना खेळाडू व विद्यार्थ्यामध्ये व्हावी तसेच क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दि. 12 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात येतो. त्या अनुषंगाने दि. 12 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे कार्यक्रमाचे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करुन क्रीडा सप्ताहाला सुरुवात करण्यता आली आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित होत असलेल्या क्रीडा सप्ताहामध्ये दि. 12 ते 18 डिसेंबर, 2024 या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोलीच्या वतीने 1)बॉक्सींग, 2) बास्केटबॉल, 3) व्हॉलीबॉल, 4) कुस्ती, 5) कबड्डी, 6) खो-खो, 7) बॅडमिंटन, 8) टेबल टेनिस या क्रीडा स्पर्धांचे व खेळाडूंचे फिटनेस, आहार, आरोग्य तपासणी असे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये तालुका संयोजकांमार्फत व क्रीडा मंडळांमार्फत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमाचा समारोप दि. 18/12/2024 रोजी सायंकाळी 04.00 वाजता करण्यात येणार असून जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडूंना सन्मानचिन्ह व ट्रकसुट भेट देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच क्रीडा सप्ताहादरम्यान आयोजीत करण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेत / उपक्रमात विजयी व उपविजयी स्पर्धकांना गौरवचिन्ह व पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे भास्कर घटाळे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.