सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 2 – सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात आज दिनांक 2 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता क्रीडा पुरस्काराचा सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रोफेसर विजय बारसे तर अध्यक्ष म्हणून अशोक कुमार भाटिया हे उपस्थित होते. सोबतच विशेष अतिथी अभीमन्यू पोरवाल, प्राचार्य डॉ.विनय चव्हाण आणि समन्वयक डॉ. प्रशांत बांबल हे सुद्धा मंचावर उपस्थित होते.

सुरुवातीला प्रमुख पाहुणे प्राध्यापक विजय बारसे यांच्या जीवनावर एक क्लिप दाखवण्यात आली. त्यानंतर झुंड ह्या चित्रपटात अभिनय केलेल्या अब्राहिम खान, मुबसिर मलिक, मोहम्मद रेहान या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार बारसे सरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर महाविद्यालयातील एकूण 70 विद्यार्थ्यांचा सत्कार अशोक कुमारजी भाटिया, अभीमन्यू पोरवाल आणि प्राचार्य डॉ.विनय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे प्राध्यापक विजय बारसे यानी त्यांच्या भाषणात विद्यार्थ्याना क्रीडा क्षेत्राकडे वळण्याकरिता प्रोत्साहित केले. अध्यक्ष अशोककुमार भाटिया व प्राचार्य डॉ विनय चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिंदन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. रेणू तिवारी, उपप्राचार्य डॉ. मनिष चक्रवर्ती, रजिस्टार श्री. स्वप्नील राठोड हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. इंद्रजीत बसू यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.जयंत रामटेके यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नितीन गडकरी का कामठी मे भव्य स्वागत..

Fri Sep 2 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी : कामठी कन्हान को जोडने वाले बहुप्रतिक्षित कन्हान नदी के ऊपर बने उड्डाण पुल के लोकार्पण  समारंभ का उद्घाटन नितीन गडकरी इनके हस्ते किया गया । इस कार्यक्रम के प्रथम भाजपा कामठी शहर द्वारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी का भव्य स्वागत एवं सत्कार बडे ही जोरो शोरो से संपन्न हुआ।  इस अवसर पर भाजपा प्रदेशाध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com