नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग व अमृत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त् विद्यमाने ‘तिरंगायन’ देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जनतेने उस्फूर्त प्रतिसाद दिला.डॉ वसंतराव देशपांडे सभागृह येथे ‘तिरंगायन’ देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कायर्क्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी सर्वश्री आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, आमदार कृष्णा खोपडे, परिणय फुके, सांस्कृतिक कार्य विभागाचे संदीप शेंडे, सुप्रसिध्द संगीतकार मोरेश्वर निस्ताने, दिवाकर निस्ताने, डॉ. उपेंद्र कोठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दुरदृष्य प्रणलीव्दारे ‘तिरंगायन’ कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अविस्मरणीय “हिंदु तन मन हिंदु जीवन” या हिंदी कवितेचे मोरेश्वर निस्ताने यांनी संगीतबध्द केलेली नृत्यनाटिका सादर करण्यात आली.
‘जहॉ डालडल पर’ , ‘ऐ मेरे प्यारे वतन’, ‘शूर आम्ही सरदार आम्हाला’,मेरा रंग दे बसंती, वंदे मातरम, देशभक्तीपर सदाबहार गीते सादर करण्यात आली. यावेळी माजी सैनिक विरसेन तांबे, शशिकांत मेनकुले, दिनकर कोलबाजी कडू, यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जागतिक क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे एम.जी.ॲन्थनी, डॉ.संभाजी भोसले, मुकूल डांगे यांच्या सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आसावरी गलांडे, प्रास्ताविक संजय भेंडे यांनी केले तर आभार मनोज साल्पेकर यांनी मानले.