संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 5:- विद्यार्थ्यांचे स्वयंशासन उपक्रमाचे आयोजन नवयुवक उच्च प्राथमिक शाळा गौतम नगर कामठी येथे शिक्षक दिनाचे दिवशी ५ सप्टेंबरला स्वयंशासन उपक्रम राबविण्यांत आला . अर्नव तांदूळकर या विद्यार्थ्यांने मुख्याध्यापक म्हणून भूमिका निभावली तर लोकेश सोनटक्के , अभिमन्यू गिरी , गिरीश बाहे , आराध्या जगने ,सानी पाटील , तेजुश्री डोई , शिवन्न्या तांदूळकर , आरोही चव्हाण या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली . याप्रसंगी विद्येची देवता सरस्वती , सावित्री बाई फुले व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यांत आले . कार्यकमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक विजय नंदनवार , प्रमुख अतिथी संस्था कोषाध्यक्ष सितारामजी रडके , विशेष अतिथी संस्था सचिव पंकज रडके ,अतुल ठाकरे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिवन झिंगरे आभार प्रदर्शन राजकुमार शेन्डे यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दिपाली आठवले , पूजा इंगोले , मयुरी यादव , नाजुका मानवटकर व विभा सोनडवले यांनी विशेष प्रयत्न केले .