नवदुर्गा ‘जागर स्त्री शक्तीचा’ सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने नवदुर्गा ‘जागर स्त्री शक्तीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तुळशीबाग येथील हर्ष लॉनमध्ये करण्यात आले. या कार्यक्रमास महिलांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजना जसे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’योजनाबाबत माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिल्या गेली. सोबत साडेतीन शक्तीपीठांच्या वास्तव्याने पावन झालेल्या महाराष्ट्राची भूमी म्हणजे भक्ती आणि शक्तीचा संगम आहे. अन्याय आणि अत्याचाराच्या राक्षसाला कंठस्नान घालून, महाराष्ट्राचे आणि देशाचे संरक्षण करणाऱ्या शक्तीमाता महाराष्ट्रात आहेत. या शक्तिमातांची थोरवी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आली. यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यातील सहा महसूली विभागाच्या मुख्यालयी व साडेतीन शक्तीपीठाच्या ठिकाणी, या कार्यक्रमाचे आयोजन 17 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या दरम्यान करण्यात येत आहे. भक्ती, लोकसंस्कृती व लोककला यांचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमात, महाराष्ट्र शासनाच्या महिला विषयक योजनांविषयी आगळ्यावेगळ्या माध्यमाद्वारे माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमामध्ये आघाडी च्या नृत्यांगना, गायिका, अभिनेते, उपस्थित होते. आदेश बांदेकर यांच्या कार्यक्रमाच्या धर्तीवर महिलांसाठी विविध खेळ व बक्षिसे देण्यात आले. तसेच विद्या वाघमारे, संदेश पाटील दिग्दर्शित सदाबहार नृत्याविष्काराला विद्या सदाफुले, विनोद गायकर आणि शर्मिला राजाराम शिंदे यांनी साज चढविला.

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या प्रिती मानमोडे व मनिषा काशिकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले . यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे, समन्वय देसाई उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बार्टी पुणेच्या वतीने दिक्षाभूमी येथे 85 टक्के सवलतीत पुस्तक विक्री

Mon Oct 23 , 2023
नागपूर :- धमचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत, उपकेंद्र नागपूर मार्फत दि. 23 व 24 ऑक्टोबर रोजी, दीक्षाभूमी येथे स्टॉल क्रमांक 262 व 263 येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार ग्रंथाचे 85 टक्के सवलतीच्या दरात विक्रीस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सोबतच सामाजिक न्याय भवन येथे बार्टीच्या विविध योजनांची माहीती सांगण्यात येणार आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!