मनपाच्या स्वच्छ मोहल्ला स्पर्धेला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद 457 मोहल्लांनी नोंदविला सहभाग ; अर्ज करण्यासाठी 30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ मोहल्ला स्पर्धेला नागपूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेत आजपर्यंत नागपूरातील 457 मोहल्ल्यांनी सहभाग नोंदविला असून, नागरिकांचा प्रतिसाद बघता स्पर्धेसाठी अर्ज करण्याची मुदत येत्या 30 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी शहारातील इतर मोहल्ल्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सॲप क्रमांक 8380002025 किंवा मनपा झोन कार्यालय येथे अर्ज सादर करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिका आणि नागपूर@२०२५ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. बक्षीसांमध्ये जाहिर रक्कमेचे विजेत्या मोहल्ल्यांमध्ये विकासकामे करण्यात येणार आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांसाठी तीन मोहल्ल्यांची निवड केली जाईल. तिनही मोहल्ल्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये असे एकूण ७५ लाख रुपये बक्षीस मिळेल. दुस-या क्रमांसाठी ५ मोहल्ल्यांची निवड केली जाईल व त्यांना प्रत्येकी १० लाख असे एकूण ५० लाख रुपये बक्षीस मिळेल. तृतीय पुरस्कार ७ मोहल्ल्यांना प्रदान केले जाईल यामध्ये प्रत्येकी ५ लाख असे एकूण ३५ लाख रुपये पुरस्कार असेल. मोहल्ला किंवा आरडब्ल्यूएत सहभागी प्रत्येकाला विकासनिधीच्या स्वरूपात पुरस्काराची रक्कम प्रदान करण्यात येईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रता निर्धारित करण्यात आली असून, त्यानुसार, मोहल्ला या भागात २०० पेक्षा कमी आणि ५०० पेक्षा जास्त घरे नसावीत. मोहल्ल्यातील प्रतिनिधींनी 8380002025 या व्हॉट्सॲप क्रमांकावरून किंवा ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून स्पर्धेसाठी अर्ज दाखल करू शकतात किंवा ऑफलाईन माध्यमातून, नागपूर महानगरपालिकेच्या झोन कार्यालयात छापील अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. झोन कार्यालयातून आवश्यकतेनुसार अधिक माहिती आणि मदत मिळू शकेल. मोहल्ल्यातील एका परिसरातील किमान दहा कुटूंबांची संबंधित अर्जावर स्वाक्षरी असणे किंवा स्पर्धेतील सहभागाला त्यांचा पाठींबा असणे, आवश्यक आहे.

स्पर्धेचा कालावधी, गुणांकन आणि पुरस्कार

१. ही स्पर्धा ३१ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.

२. स्पर्धेसाठी अर्ज प्राप्त होताच, मोहल्ल्याचे मूल्यांकन करण्यात येईल. या माध्यमातून मोहल्ल्याचे निर्धारीत मापदंडांनुसार मूल्यांकन होईल.

3. स्पर्धेचा अंतिम निर्णय एप्रिल २०२३ मध्ये जाहीर करण्यात येईल.

मूल्यांकन करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे आणि मापदंड

Ø कच-याचे वर्गीकरण, डोअर टू डोअर आणि फाटकापर्यंत हिरवा कचरा जमा करणे (ओला किंवा जैवविघटनशील कचरा)

Ø कचरा दररोज मनपाच्या कर्मचा-यांकडून उचलला जायला हवा.

Ø मोहल्ल्यातील प्रत्येक दुकान आणि विक्रेत्याने एकदा वापरून फेकावयाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलेली असावी.

Ø नागरिकांकडून स्वच्छता अॅपचा वापर

Ø ओल्या कच-यातून कंपोस्टची निर्मिती

Ø सर्व नागरिकांना, दुकानांमध्ये जागरुकता अभियान, स्वच्छतेविषयक संदेश देण्यात यावा.

Ø विविध कंपन्या किंवा मनपाच्या उपक्रमांमधील बांधकामाचा कचरा परिसरात टाकण्यास बंदी आणि यासाठी परिसराची नियमित साफसफाई केली जाणे आणि त्यावर देखरेख असणे.

Ø स्वच्छ उद्याने, सार्वजनिक जागा, वाहनतळ (पार्कींग) आदींची स्वच्छता

Ø कचरा व्यवस्थापन / किंवा स्वच्छतेविषयक अभिनव योजना/संकल्पनांची आखणी

Ø प्राणी आणि कुत्र्यांच्या घाणीचे व्यवस्थापन

Ø मनपाच्या चमूकडून सार्वजनिक शौचालयांचे व्यवस्थापन सांडपाण्यावर प्रक्रिया, सहज उपलब्धता आणि स्वच्छता

Ø ब्लॅक स्पॉट अर्थात कचराकुंड्यांचा निचरा आणि पुन्हा साचू नये, यासाठी देखरेख

Ø मोहल्ला किंवा परिसरात रस्त्यावरील विक्रेते, फिरती दुकाने आणि आस्थापनांमध्ये कचराकुंड्या

Ø लाल डाग अर्थात थुंकलेली जागा स्वच्छ करणे आणि त्यात वाढ होऊ नये, यासाठीची काळजी

Ø तीन आर म्हणजे पुनर्वापर (रियुज), वापर कमी करणे (रिड्यूस), पुनः प्रक्रीया (रिसायकल) या त्रिसूत्रीची अंमलबजावणी आणि कोरड्या कच-याचे वर्गीकरण

Ø मनपाच्या यंत्रणेच्या माध्यमातून सांडपाण्याचा निचरा

Ø नागरिक आणि स्वच्छता कर्मचा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कृत किंवा सन्मानित केले जाणार आहे. तरी नागरिकांनी त्वरा करीत स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जैन भागवती दीक्षा महोत्सव 27 को

Wed Jan 25 , 2023
मुमुक्ष भाई रमेशचंद चोपड़ा ग्रहण करेंगे दीक्षा अनेक साधु-साध्वि उपस्थित रहकर देंगे आशीर्वाद नागपुर :-श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ की ओर से युवाचार्य भगवंत महेंदऋषिजी म.सा की प्रेरणा से व मालवा प्रवर्तक प्रकाशमुनि म.सा, उपप्रवर्तक अक्षयऋषिजी म.सा के सानिध्य में जैन भागवती दीक्षा महोत्सव का आयोजन शुक्रवार 27 जनवरी को किया गया है. दीक्षा महोत्सव का कार्यक्रम श्रीमती रजनीदेवी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!