जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- फिर्यादी सचिन साबुदास महंत वय ३० वर्ष रा. खानगाव, सावनेर, ह.मु. बिल्डींग न. ५३ प्रधानमंत्री आवास योजना, तरोडी, वाठोडा याचे रश्मी लोखंडे नावाचे महिले सोबत मागील दिड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तसेच नमुद महिला रश्मी लोखंड हिचे आरोपी नामे स्नेहल रंजन घोडेस्वार वय ३८ वर्ष रा. प्लॉट न. ४४, न्यू शंकर नगर, दिघोरी नाका याचे सोबत सुद्धा प्रेमसंबंध असल्याचे फिर्यादीस माहिती झाल्याने फिर्यादी व महिलेचे भांडण झाले होते. फिर्यादीने महिलेस भेट दिलेला मोबाईल परत मागीतला होता. दिनांक ३०.०५.२०२३ मे २२.३० वा.चे सुमारास नमुद महिलेने मोबाईल परत देण्याकरीता फिर्यादीस पोलीस ठाणे हुडकेश्वर दिघोरी चौकात बोलाविले. फिर्यादी तेथे गेले असता आरोपी हा सुद्धा तेथे होता. फिर्यादी व आरोपी यांच्यात बाचाबाची होवुन झालेल्या भांडणात आरोपीने त्याचे जवळील चाकू काढून फिर्यादीने मानेवर तसेच पोटावर चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले.. जखमीचा उपचार मेडीकल हॉस्पीटल येथे सुरू आहे.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे आरोपीविरूध्द पोउपनि बालु राठोड  यांनी कलम ३०७ भादंवी. अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपीचा शोध घेवून त्यास अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

Wed May 31 , 2023
नागपूर :- दिनांक २९.०५.२०२२ चे १६.४५ वा. चे सुमारास पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत राहणारे ४५ वर्गीय फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी वय १६ वर्ष ही पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत एका कॉम्पलेक्स मधील शोरूम मध्ये खरेदी करीता गेली असता आरोपी सेल्समन नामे गजानन बबन दांडेकर वय ३३ वर्ष रा. टि.व्ही वर जवळ, सेमेनरी हिल्स याने फिर्यादीचे मुलीला स्पर्श करून मुली सोबत लज्जास्पद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com