सायकलप्रेमींचा मनपाच्या ‘सायकल एक्स्पोला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

– ३ जून रोजी सायकल रॅली

नागपूर :-‘जागतिक सायकल दिनाचे’ औचित्यसाधून येत्या ३ जून २०२३ रोजी सकाळी ६ वाजता नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील सायकलपटूंच्या सहकार्याने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या अनुषंगाने यशवंत स्टेडियम येथे द्विदिवसीय मनपा सायकल एक्स्पोचे आयोजन करण्यात आले. सायकल एक्स्पो ला दोन्ही दिवशी सायकलप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी एक्स्पोला भेट देत विविध अत्याधुनिक सायकलची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी मनपाचे उपायुक्त सुरेश बगळे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह सायकल पट़टु प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्वप्रथम मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी एक्स्पोच्या प्रवेश द्वारातून आत येत असताना सायकलद्वारे भ्रमंती करणाऱ्या शहरातील विविध सायकलपटूंचे भित्तीचित्रांचे अवलोकन केले. या ‘वॉल ऑफ फेम’ मध्ये ज्येष्ठ सायकलपटू ते चिमुकल्या सायकल चालकांचे चित्र तसेच विविध जनजागृतीपर संदेश देण्यासाठी सायकलद्वारे देशभरात फिरणाऱ्या सायकलपटूंचे चित्र लावण्यात आल्याने याद्वारे नागरिकांना सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समाधान आयुक्तांनी व्यक्त केले. नागपूर स्मार्ट ॲड स्टोनेबल सिटी डेव्हलपमेंट कारपोरेशन लिमिटेड चा सहकार्य रॅली मध्ये मिळत आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारत असतांना पर्यावरणात कार्बनचे उत्सर्जन कमी व्हावे आणि नागरिकांचे स्वास्थ्य देखील सुदृढ राहावे या उद्देशाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना विविध प्रकारच्या सायकलची माहिती मिळावी याकरिता एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी देखील या एक्स्पोला उदंड प्रतिसाद दर्शविला.

पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही सकाळ पासूनच सायकलप्रेमींनी एक्स्पोला भेट देण्याची सुरुवात केली होती. अत्याधुनिक सायकल बघण्यासाठी सायकलप्रेमींची प्रवीण सायकल स्टोर, भाग्यश्री ट्रेडिंग कंपनी, गियर हेड मोटार, चीप सायकल स्टोर, नरेशचंद्र अँड कंपनी यांच्या प्रत्येक दालनात प्रचंड गर्दी केली. याशिवाय एक्स्पोमध्ये ऑनलाईन नोंदणी केलेल्या स्पर्धकांना टी-शर्ट प्रदान करण्यात आले. आकर्षक टी-शर्ट घेण्यासाठी स्पर्धकांची रेलचेल बघायला मिळाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वटवृक्ष वृक्षारोपण महोत्सवाचे उद्या उदघाटन,जल संवर्धनासाठी महत्वाचे पाऊल

Fri Jun 2 , 2023
चंद्रपूर :- जल संवर्धनासाठी महत्वाचे पाऊल म्हणुन जिल्हा प्रशासन,चंद्रपूर महानगरपालिका व नटराज निकेतन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वटवृक्ष वृक्षारोपण महोत्सवाचे उदघाटन ३ जुन रोजी जुनोना चौक येथील अटलबिहारी वाजपेयी क्रीडा संकुल येथे सकाळी ९ वाजता केले जाणार आहे. भारतीय संस्कृतीत पर्यावरण संरक्षण-संवर्धनाला महत्व आहे. पर्यावरणाचे महत्त्व जाणून ही निसर्ग संपत्ती आपल्या पुढच्या पिढीला सुस्थितीत देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com