नागपूर :- उपराजधानीत प्रथमच साडी वाकथानचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यात महिलांनी मोठ्या संख्येत साडी नेसून शहरातील प्रमुख रस्त्यांवर आपला उत्साह वर्धक प्रदर्शन करून धमाल उडवली.
आहार तज्ञांच्या न्यूट्रीस्वाग टीम रश्मी लोबो मुरारकर, विकिता पाटील रामटेके आणि कंचन बोडडे आणि जेसीआय नागपूर झिरो माइल च्या सहकार्याने 26 मार्च रोजी, सकाळी महिलांच्या उत्सवांसाठी महिला स्वाःस्त आणि परंपरेला चालना देण्यासाठी आयोजननाचे कार्यक्रम आयोजित कार्यक्रमात १५० शेहून अधिक महिला उस्फूर्तने जापानी गार्डन चौकात एकत्रित झाल्या. लाफ्टर क्लबचे सदस्य किशोर थुथेजा आणि चेमूच्या वार्माअप सत्रासोबत आयोजनास सुरुवात झाली.
मुंबई मुख्य न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील विधीज्ञ स्मिता सिंगलकर यांनी फित कापून आयोजनाचे उद्घाटन केले. त्यानंतर महिला सक्षमीकरण आणि अत्याचार, ग्रस्त महिलांच्या पुनर्वसन क्षेत्रातील त्यांचे कार्य सांगून सहभागी महिलांना प्रोत्साहित केले. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, आणि द्वितीय पुरस्कारासह प्रथम दहा सहभागींना चषक, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. कविता बक्षी आणि आहार तज्ञ डॉ.सोनल कोलते यांनी परीक्षण केले. याप्रसंगी डॉ. हीना मुरारकर, नरुल हुक, राजेंद्र जयस्वाल, पंकज जयस्वाल, श्रद्धा, धैर्यशील वाघमारे, प्रामुख्याने उपस्थित होते.