औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामास गती द्या – जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर

औद्योगिक व शेतीविषयक मालाच्या निर्यातसाठी पुढाकार घेणार

नागपूर :-  बुटीबोरी, हिंगणा व वाडी या औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी व घनकचरा वर्षानुवर्षे साठविण्यात आला आहे. सांडपाणी तलावात साचून अशुध्द पाण्यामुळे नागरिकांना त्रास होतो. याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वाचे काम करुन तातडीने कार्यवाही करावी व या कामास प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.

जिल्हाउद्योग मित्र समिती, जिल्हा निर्यात प्रचालन समिती व स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारीएम.डी. पटेल तसेच संबंधित अधिकारी व जिल्हा उद्योग मित्र समितीचे उद्योग प्रतिनिधी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

उद्योग व शेती विषयक मालाच्या निर्यातील चालना मिळण्यासाठी जिल्हा निर्यात प्रचालन समिती रोजी गठीत करण्यात आलेली असून या प्राधान्याने पुढाकार घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

या समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असून विदेश व्यापार महानिदेशालयाचे प्रतिनिधी उपाध्यक्ष आहेत जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सचिव आहेत. तर जिल्हा वस्तु व सेवाकर अधिकारी नागपूर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, अपेडाचे अधिकारी,जिल्हयातील निर्यात प्रचालन परिषदेचे सदस्य प्रतिनिधी, जिल्हयातील दोन आद्योगिक संघटनाचे प्रतिनिधी, नाबार्ड नागपूर चे अधिकारी संचालक, सुक्ष्म लघु व मध्यम उपक्रम यांचे प्रतिनिधी सदस्य, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र आद्योगिक विकास महामंडळाचे सदस्य आहेत तर निमंत्रित सदस्य म्हणून जिल्हास्तरीय अधिकारी व सल्लागार आद्योगिक संघटना आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक मुद्दमवार यांनी सांगितले.

भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग विभागाने वाणिज्य सप्ताहअंतर्गत Exporters Conclave चे आयोजन जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत आयोजीत करण्यात आले. तसेच जिल्हा उद्योग केंद्र नागपूर उदयोग संचालनालया मार्फत Conclave on investmentदोन दिवसीय प्रदर्शन आयोजीतकरण्यात आले. या कार्यक्रमास व प्रदर्शनास निर्यातदार, निर्यातक्षमउदयोजक, उदयोजक, नवउद्योजक, ओदयोगीक संस्था व संघटना, औदयोगीक समूह औदयोगीक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रीया उत्पादक, केंद्र व राज्य शासनांचे तसेच संबंधितउपक्रमांचे जिल्हास्तरीय अधिकारी जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य निर्यात संबंधी कामकाजकरणारे घटक, संशोधक बँका इत्यादीनां उपस्थित होते. जिल्हामध्ये शेती व शेती सबंधित उत्पादणे राईस, भिवापूर चिली ( GI).संत्रा, सोयाबीन आणी सोया उत्पादणे, अन्न प्रक्रिया उद्योग / पॅकेज केलेले खादय पदार्थ, टेक्सटाईलमध्ये कॉटन व कॉटन यार्न One District One Product अंतर्गत संत्रा फळाची निवड झालेली आहे.हस्तकलेमध्ये आगरबत्ती, आपण आणी स्टिल, फॅब्रीकेटेड इंजिनिअरींग अॅटो इंजिनिअरींग इत्यादीउत्पादनाचे निर्यात केली जाते, असेही त्यांनी सांगितले.

उद्योग प्रतिनिधींनी उद्योग समूहांकडून ग्रामपंचायत मोठ्याप्रमाणात कर आकरणी करत आहे, याविषयी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. वाडी येथील सांडपाणी प्रक्रिया, हिंगणा औद्योगिक क्षेत्रातील वर्षानुवर्षे साठलेला घनकचरा, हिंगणा व वाडी येथील वाहतूकीसाठी बायपास रोड, एमआयडीसी हिंगणा येथे सीईटीपी स्थापित करणे,बुटीबोरी येथील इसीसचे रुग्णालय, स्थानिकांना रोजगार, आदी विषयांचाआढावा यावेळी घेण्यात आला.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

108 वी ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ ची विद्यापीठात तयारी , जिल्हाधिकारी व कुलगुरुंच्या उपस्थितीत आढावा

Fri Dec 16 , 2022
नागपूर : भारतीय विज्ञान परिषदेचे (इंडियन सायन्स काँग्रेस) 108 वे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली 3 ते 7 जानेवारी या कालावधीत विद्यापीठ परिसरात होणार आहे. जिल्हाधिकारी व कुलगुरूंच्या मार्गदर्शनात यासंदर्भातील आढावा घेण्यात आला.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला देश-विदेशातून मान्यवर येणार आहेत. या ठिकाणी उपस्थित होणारे विषय, संशोधन, चिंतन देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान जगताला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com