मुंबई :- मुंबई उपनगरातील “शुभ दीपावली,स्वच्छ दीपावली” हा उपक्रमाची तसेच कंटेनर अंगणवाड्यांची कामे कामे गतीने करावीत, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.
मंत्रालय दालनात “शुभ दीपावली, स्वच्छ दीपावली” उपक्रमाच्या मंत्रालय येथे आयोजित आढावा बैठकीत मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुंबई उपनगर जिल्हा नियोजन अधिकारी भूषण देशपांडे यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, रंगरंगोटी, दुरुस्ती करणे, आवश्यकता भासेल तिथे ड्रेनेज पाइप लाईन बदलणे, शौचालयातील आसन क्षमता वाढवणे, खराब शौचालयाची पुनर्बांधणी करणे, पाण्याची व्यवस्था करणे,शौचालयांकरिता विज बिल आकारणी याबाबतची कामे परिपूर्ण करा. तसेच मुंबई उपनगर मधील झोपडपट्टी भागातील कंटेनर अंगणवाड्यांची कामे गतीने पूर्ण करा’.
यावेळी म्हाडा, मुंबई महा पालीका तसेच झोपडपट्टी पुनर्वसन,महिला बाल विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.