विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी

अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची मुदत 2 जुलै दुपारी 12 पर्यंत

     मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवारदिनांक 3 जुलै आणि सोमवारदिनांक 4 जुलै2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवारदिनांक 2 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवारदिनांक 3 जुलै रोजी सभागृहात होईल. विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी या विशेष अधिवेशनास उपस्थित रहावे, असे आवाहन विधानमंडळ सचिवालयाने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कृषि दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा

Fri Jul 1 , 2022
महाराष्ट्र सुजलाम- सुफलाम होण्यासाठी प्रयत्न करू !             मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र समृद्ध, सुजलाम- सुफलाम व्हावा यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कृषी दिनाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.             महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून मुख्यमंत्री म्हणाले की, हा दिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र समृद्ध, सुजलाम- […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com