‘सावित्रीबाई फुले’ यांच्या जयंती निमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘सावित्रीबाई फुले’ यांच्या जयंती दिनानिमित्त विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत दोन भागात प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी तर दुसऱ्या भागाचे मंगळवार दि. 14 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारण होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी लढा दिला. अस्पृश्यता, बालविवाह, सती प्रथा यासारख्या वाईट गोष्टींना त्यांनी विरोध केला. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे तसेच स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, हे सावित्रीबाईंनी ओळखले. यासाठी त्यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्यासह मोठी कामगिरी बजावली. त्यांचे योगदान आणि विचार आजच्या समाजासाठी कसे मार्गदर्शक आहेत. याविषयी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी माहिती दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मनपाद्वारे विनम्र अभिवादन

Fri Jan 3 , 2025
नागपूर :- स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत, थोर समाज सुधारक, शिक्षण प्रसारक ज्ञानज्योती, आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या प्रसंगी उपायुक्त विजया बनकर, उपायुक्त विजय देशमुख, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, अमोल तपासे, अजय माटे, गजानन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!