शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीकरीता शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी विशेष नैमित्तीक रजा

गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्धीपत्रकान्वये नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणूकीचा दिनांक 30 जानेवारी (सोमवार) रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 पर्यंत असून मतमोजणी दिनांक 2 फेब्रुवारी (गुरुवार) रोजी होणार आहे.

या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या शिक्षक मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा शासन निर्णयानुसार मिळणार आहे. सदरची रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे असे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (सा.प्र.) विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकगीतांतून लोकशाहीचा जागर २०२२ स्पर्धेचा निकाल जाहीर

Tue Jan 10 , 2023
मुंबई : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर – 2022’ या स्पर्धेचा निकाल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घोषित केला आहे. लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे दिनांक 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत -एकल गटांतर्गत स्नेहा मेश्राम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com