नागपूर :-नागपूर जिल्हा ग्रामीण जिल्हातंर्गत पोलीस स्टेशन मधील वाहतुक नियमन करणारे नियुक्त असलेले अधिकारी / अंमलदार व वाहतुक शाखा तर्फे वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या विरूध्द निरंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येते. वाढत्या अपघाताचे प्रमाण विचारात घेता व त्याचे विश्लेषण करून रस्ते अपघातांना आळा घालण्याकरीता अपघातास कारणीभूत ठरणाच्या कारणांवर विशेषतः लक्ष देवून त्याव्दारे दि. १/७/२०२३ ते ३१/७/२०२३ पर्यंत मोटार वाहन अधिनियम अंतर्गत वेगवेगळया मोहीमा आयोजित करून कारवाई करण्यात आली आहे. अपघातास कारणीभूत ठरणाऱ्यामधे मुख्यतः अवैध प्रवासी वाहतूक, विना हेल्मेट, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, वेगमर्यादे पेक्षा वाहन चालविणे, विना सिटबेल्टचा वापर करणे इत्यादी प्रकारच्या शिर्षकाखाली विशेष मोहीम राबवून खालील प्रमाणे कार्यवाही करून दंड वसुल करण्यात आला आहे.
वरिल शिर्षकाखाली विशेष मोहीम राबवून नागपूर जिल्हा ग्रामीण जिल्हातर्गत पोलीस स्टेशन व वाहतुक शाखा तर्फे करण्यात आलेल्या कारवाईमुळे दि. १/७/२०२३ ते ३१/७/२०२३ पर्यंत पडलेल्या अपघाताची आकडेवारी पाहता अपघातांना आळा घालण्यास यश प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे नागपूर ग्रामीण जिल्हा अंतर्गत सर्व पोलीस स्टेशन तसेच जिल्हा वाहतुक शाखा नागपूर ग्रामीण येथील वाहतुक अधिकारी व अंमलदार तसेच प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यासह संयुक्तिकरीत्या जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविदयालय येथे होणारी शालेय परिवहन वाहतुक बाबतीत वापरण्यात येणारी स्कुल बस मार्गदर्शकतत्त्वा प्रमाणे सुनियमित वाहतुकीसंबंधाने स्कुल बसेसची पडताळणी / त्याचप्रमाणे वाहनाची सर्व कागदपत्रे पडताळणी संबंधाने विशेष मोहीम राबवुन ज्या स्कुल बसचे कागदपत्रे परिपुर्ण आढळून न आल्यास त्यांच्यावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्या मार्फत योग्य तो दंड आकारण्यात येवुन संबंधीत पोलीस स्टेशन मध्ये वाहन डिटेन करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही व त्याचे फलीत यात प्रामुख्याने विशाल आनंद (भापोसे), पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, डॉ. संदिप पखाले, अपर पोलीस अधिक्षक, नागपूर ग्रामीण, विजय माहुलकर, प्रभारी पोलीस उप अधिक्षक (गृह), नागपूर ग्रामीण यांचे मोलाचे मार्गदर्शन असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी अधिकारी / कर्मचारी यांचे सहभागाने राबविली.