२३ मार्च ला कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मदिना निमित्त विशेष बुध्द वंदना व धम्मदेसनाचे आयोजन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला माल्यार्पण व अभिवादन

– युवा रोजगार मार्गदर्शन शिबीराचे सुध्दा आयोजन.

कामठी :- बिडी कामगारांचे हृदयसम्राट व माजी राज्य सभा सदस्य कर्मतिर दादासाहेब कुंभारे यांनी संपूर्ण जीवन बिडी कामगार तसेच इतर कामगारांच्या समाजिक व आर्थिक सबलीकरण करण्याकरिता आपले महत्वपूर्ण योगदान दिले.

कर्मविर दादासाहेब कुंभारे यांच्या १०२ व्या जन्मदिनानिमित्त रविवार दिनांक २३ मार्च २०२५ रोजी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दिनांक २३ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या शिल्पाला महसुल मंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल, तसेच हस्दास विद्यालय, हरदास प्राथमिक शाळा, दादासाहेब कुंभारे विद्यालय मेरी, ड्रैगन इंटरनॅशनल स्कूल, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र च्या वतीने सुध्दा कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांना मानवंदना देण्यात येईल. या प्रसंगी उत्कृष्ट काम करणारे सुनिल वानखेडे व संगीता मानवटकर यांचा सत्कार महसुल मंत्री . चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी सकाळी १०:०० वाजता पूजनिय भिक्षु संघाच्या उपस्थितीत विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे सर्वप्रथम तथागत गौतम बुध्दांना मेणबत्ती व अगरबत्ती लावून विशेष बुध्द वंदना घेण्यात येईल, तसेच भिक्षु संघाच्या वतीने उपस्थितांना धम्मादेसना देण्यात येईल. यावेळी उपस्थित पूजनिय भिक्षु संघाला ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते भोजनदान व कठीण चिवस्दान देण्यात येईल.

दिनांक २४ मार्च २०२५ युवा रोजगार मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

ड्रॅगन पॅलेस परिसरात असलेल्या कर्मवीर दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र येथे युवकांकरिता युवा रोजगार मार्गदर्शन शिवीराचे आयोजन करण्यात आले आहे या शिवीराला सुक्ष्म, लघु व मध्य उ‌द्यम विभागाचे संचालक शिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्राचे अनिल पाठील व समाजकार्य महाविद्यालयाचे संचालक पुरण मेश्राम मार्गदर्शन करणार आहेत, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे राहतील या युवा रोजगार शिबीराला मोठ्या संख्येनी युवकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आव्हान सागर भावे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी येथे सौंदर्यप्रसाधनावर निशुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Sat Mar 22 , 2025
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- माजी नगरसेविका वैशाली मानवटकर यांच्या वतीने भागुबाई सभागृह बजरंग पार्क येथे महिलांसाठी सौंदर्य प्रसाधनावर निशुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचा 400 महिलांनी लाभ घेतला मुंबई येथील तज्ञ मार्गदर्शिका संगीता नायडू यांचे हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून सौंदर्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका वैशाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!