संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यात मागील चार दिवसांपासून पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी कामाला गती दिली.यानुसार कामठी तालुक्यात आजपावेतो 1 हजार 330 हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे.आता पेरणीवर पाऊस गरजेचा असल्याने पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
कामठी तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान 1065 मी मी असून यावर्षी मागील चार दिवसात पडलेल्या पावसाची नोंद 40.70करण्यात आलेली आहे.कामठी तालुक्यात धान पिकाखाली सर्वसाधारण 10 हजार 346.70 हेक्टर क्षेत्र असून सद्यस्थितीत 192 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाचे परहे टाकण्यात आले असून उर्वरित परहे टाकण्याचे काम सुरु आहेत.सोयाबीम पिकाखाली सर्वसाधारण क्षेत्र 4025 .4 हेक्टर क्षेत्र असून सद्यस्थितीत 185 हॅकटर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे व उर्वरीत पेरणी सुरू आहे . कापूस पिकाखाली सर्वसाधारण 5 हजार 514 .40हेक्टर क्षेत्र असून 765 .50हॅकटर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झालेली आहे उर्वरित पेरणी सुरू आहे.तूर पिकाखाली सर्वसाधारण 2135 हॅकटर क्षेत्र असून 188.50हॅकटर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून उर्वरित पेरणीचे कामे सुरू आहेत.