कुही हद्दीत दारू तस्करावर कुही पोलीसांची धडक कारवाई

कुही :-पोलीस स्टेशन कुही हद्दीतील चाफेगडी परीसरात दारूची अवैध्य वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती कुही पोलीसांना मिळाल्याने दिनांक ०४/०६/२०२४ रोजी सकाळी ०६.५१ वा. पोलीस स्टेशन कुही येथील अधिकारी व स्टॉफसह वरीष्ठांना माहिती देवून दिपक अग्रवाल (भापोसे), पोलीस निरीक्षक कुही यांचे नेतृत्वात चाफेगडी शिवारात जावून पेट्रोलींग करीत असता इसम नामे हरीदास मोतीराम मांढरे हा आपले मोटारसायकलने येतांनी दिसला. त्याचे मोटारसायकलवर एक पिवळया रंगाची प्लास्टिक चुंगडी दिसली. त्याची झडती घेतली असता प्लास्टिक बुंगडीमध्ये भिंगरी संत्रा नं. १ ची ९० एम, एल. चे २०० निपा मिळुन आले. करीता मोटारसायकल क्र. एम.एच. ४० जे. ३७५९ किंमती ५०,०००/- रू. व २०० निषा किंमती ७,०००/- रु. असा एकुण किंमती ५७,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढिल कार्यवाही करण्यात आली.

सदरची कार्यवाही ही  हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर (प्रा.), रमेश धुमाळ अपर पोलीस अविक्षक नागपुर (आ),  उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे मार्गदर्शनाखाली परी, सहायक पोलीस अधिक्षक तथा प्रभारी ठाणेदार कुही दिपक अग्रवाल (भापोसे), पोउपनि हरिहर सोनकुसरे, पो.हवा. चांगदेव कुथे, नापोशि. गोकुल सलामे, पोअं, रविन्द्र मारवदे, पोअं. पंकज सावरे यांचे पथकाने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सावनेर पोलीसांनी अवैध दारू बाळगणारे आणि वाहतुक करणाऱ्या ०४ इसमावर कारवाई करून एकूण १५,५९,२६०/- रू. चा मुददेमाल जप्त केला

Wed Jun 5 , 2024
सावनेर :-दिनांक ०४/०६/२०२४ रोजी दारू विक्री बंद असल्याने तसेच मतमोजणी असल्याने दि. ०३/०६/२०२४ रोजी २३.०० वा. ते दिनांक ०४/०६/२०२४ रोजी से ०५.०० वाजता कोंबीग ऑपरेशन दरम्यान २३.२५ वा. दरम्यान गांधी चौक येथे एम.एच ४० सि.एच ८७६५ कर्माकाची लाल रंगाची किया गाडी संशईत रित्या मिळुन आल्याने पोलीस अधिकारी आणी अंमलदार यांनी गाडीची झडती घेतली असता किया गाडी क्रमांक एम. एच ४० […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com