कुही :- पोस्टे. कुही हद्दीतील मौजा सालई गोधनी शिवारात जुगार सुरू असल्याबाबत गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीशिर माहीती वरून दिनांक ०५/०८/२०२३ रोजी पोलीस स्टेशन कुही येथील पोलीसांच्या पथकाने सदर जुगार अड्डयाची योजनाबद्ध पद्धतीने आखणी करूण सदर जुगार अड्ड्यावर धाड टाकुण सदर जुगार अड्डयावर ३३ जुगार खेळणारे आरोपीतांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमधुन २१३,००० /- रु. नगदी तसेच डावावर लावलेले ६८,०००/-रु. नगदी असे एकुण २,८१,००० /- रु नगदी तसेच घटनास्थळावर जुगार क्लब प्रमाणे सुविधा पुरवीण्याकरीता गॅस सिलेंडर, खुर्ची, गंज, मिक्सर, बॅटरी लाईट या प्रकारचे सामान तसेच दोन चारचाकी वाहन व १४ दुचाकी वाहने तसेच आरोपीतांकडील मोबाईल फोन असा एकुण ३०,७६,२००/-रूपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. सदर घटनास्थळाची पाहणी केली असता यातील आरोपी पैकी आरोपी क्र १) नामे सोहन मेश्राम वय ३५ वर्ष, रा. विठ्ठलवाडी हुडकेश्वर रोड नागपुर हा जुगार खेळणाऱ्या लोकांना जागा उपलब्ध करूण देतो व जुगार खेळणाऱ्या लोकांच्या जेवणापासुन सर्व सुवीधा जागेवर पुरवीत असल्याचे घटनास्थळाच्या पाहणी वरूण दिसुन येत होते. पोलीसांना आपल्या जुगार खेळण्याचा जागेचा पता लागु नये तसेच पोलीस कार्यवाही करण्याकरीता येत असल्यास आधिच सुचना देण्याकरीता आरोपींनी घटनास्थळाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर पहरेदार (वॉचर) ठेवले असतांना सुध्दा पोलीसांनी मोठ्या शिताफीने पहरेदाराच्या नजरेत न येता चार शेत पायदळ चालून सदरची कामगिरी केली.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक विशाल आनंद (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार IPS अनिल म्हस्के, पोलीस स्टेशन कुही परि पोलीस उपअधिक्षक तथा प्रभारी ठाणेदार भिवापुर राहुल झलाटे, पोलीस उपनिरीक्षक देवीदास उमके, पोलीस नायक हरीदास वाचरकर, रौशन नारनवरे, ग्यानीवंत गुरपुडे, पोलीस शिपाई दुर्गेश डहाके, अनिल करडखेले, आशिष खंडाईत, उमेश ठवकर, रविंद्र मारवदे, पंकज सावरे, तुषार भोयर पियुष वाढीवे यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे.