झोपडपट्टी भागात पर्याप्त दाबाने पाण्याची आपूर्ति करा 

बैठकीत मनपा आयुक्तांचे निर्देश

नागपूर, ता. १९ : शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नागपूर महानगपालिकेद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात झोपडपट्टी भागात पाण्याची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे अशा भागात पर्याप्त दाबाने पाण्याची आपूर्ति करा. तसेच शहरातील ज्या भागात पाणी टंचाई आहे अशा भागात टँकरने पाणी पुरवठा करा, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी. यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  मंगळवारी (ता. १९) शहरातील पाणी टंचाई व त्यावरील उपाययोजनांबाबत मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्तांच्या सभाकक्षात आढावा बैठक पार पडली.

            बैठकीला अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाच्या जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मनपाचे कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर, मनपाचे तांत्रीक सल्लागार (NESL) श्री. मनोज गणवीर, ऑरेंज सिटी वॉटर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय रॉय, वरिष्ठ अधिकारी श्री. राजेश कालरा तसेच डेलिगेट्स व झोनल व्यवस्थापक आदी उपस्थित होते.

            यावेळी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपाच्या दहाही झोन मधील पाण्याच्या सद्यःपरिस्थितीचा आढावा घेतला. शहरात ज्या भागात पाणी टंचाई आहे अशा भागात टँकरने पाण्याची व्यवस्था करा. तसेच झोपडपट्टी भागातील नळाला पर्याप्त दाबाने पाण्याची आपूर्ति करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुढे ते म्हणाले, असे करीत असतानाच पाण्याच्या समस्येवर वेगवेगळ्या भागातील नागरिकांचा अभिप्राय घेणे आवश्यक आहे. यासाठी ऑरेंज सिटी वॉटर कंपनीतर्फे दररोज नागरिकांचा अभिप्राय घेण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिली.

            पुढे ते म्हणाले, यावर्षी उष्णता जास्त असल्यामुळे नागरिकांचा पाण्याचा वापर वाढलेला आहे. मात्र, पाण्यासाठी नागरिकांना त्रास होऊ नये, त्यांना स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर कंपनीची आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी दूषित जल पुरवठा होत आहे अशा ठिकाणी सुद्धा टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा व लीक असलेल्या, दूषित पाईपलाईन तात्काळ बदलवून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यावेळी दिले. झोननिहाय अवैध नळ जोडणा-यांची माहिती तयार करून कारवाई करने त्याच प्रमाणे टूल्लू पंप थेट नळाला लावणाऱ्या ग्राहकांचा शोध घेऊन, टूल्लू पंप जप्तीची कार्यवाही करने. नॉननेटवर्क भागात सुद्धा आवश्यकते नुसार टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात यावे असे निर्देश आयुक्त यांनी मनपा अधिका-यांना दिले.

            यावेळी ऑरेंज सिटी वॉटर कंपनीतर्फे शहरात केल्या जाणाऱ्या उपाययोजना व त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मुख्यमंत्र्यांनी घेतला उर्जा विभागाचा आढावा

Tue Apr 19 , 2022
८००० मेगा वॅट औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेऊन तातडीच्या उपाययोजना करा- मुख्यमंत्री राज्याला वीजेबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी तात्कालीक तसेच दीघकालीन धोरण निश्चित करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उर्जा विभागाला निर्देश मुंबई दिनांक १९:   राज्याला वीजेबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी विभागाने तात्कालीक स्वरूपात करावयाच्या तसेच दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या कामांचे धोरण निश्चित करावे, सध्याची वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन ८ हजार मे.वॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com