नागपूर :- महात्मा गांधी जयंती (०२ ऑक्टोबर २०२४) व घटस्थापना (०३ ऑक्टोबर २०२४) दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहे. या संदर्भातील आदेश मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहे.
उपायुक्त यांच्या आदेशानुसार, महात्मा गांधी जयंती (०२ ऑक्टोबर २०२४) व घटस्थापनानिमित्त (०३ ऑक्टोबर २०२४) शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक ०२ सप्टेंबर २०१८ रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजूर ठरावा अन्वये मा. आयुक्त यांचे दिनांक ०३/०८/२०१८ चे मंजूरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे.जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर मनपाच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येईल.