पोळा सणानिमित्त कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद.

नागपूर,१३ता. “पोळा सनानिमित्त” गुरूवार १४ सप्टेंबर रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहे.या संदर्भातील आदेश मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहेत.

उपायुक्त यांच्या आदेशानुसार, “पोळा सनानिमित्त” गुरूवार दिनांक १४ सप्टेंबर २०२३ ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक ०२/०९/२०१८ रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजुर ठराव क्रं. २४० दिनांक ०२/०७/२०१८ अन्वये मा.आयुक्त यांचे दिनांक ०३/०८/२०१८ चे मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार गुरूवार दिनांक १४ सप्टेंबर २०२३ ला “पोळा सनानिमित्त” नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येईल. असे आदेशात सांगण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Maharashtra Governor given 'Jain Hiteshi Award' by Gurudevshri Rakesh

Thu Sep 14 , 2023
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais attended the Satsang discourse by revered Gurudevshri RakeshJi, Spiritual head of the Shrimad Rajchandra Mission Dharampur on the occasion of ‘Paryushan Mahaparva’ in Mumbai on Wed (13 Sept). Pujya Gurudev conferred the title of ‘Jain Dharma Hiteshi’ on Maharashtra Governor Ramesh Bais for the latter’s role in preventing the Jain Teertha Sthal of ‘Shri […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!