नागपूर :- विभागीय लोकशाही दिनात आज सहा तक्रार प्रकरणे निकाली काढण्यात आले.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयात प्रलंबित सहा व या महिन्यात प्राप्त चार अशा एकूण 10 तक्रार अर्जांवर सुनावणी पार पडली. श्रीमती बिदरी यांनी यावेळी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले व प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, उपायुक्त घनश्याम भूगावकर, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विशाल आनंद यांच्यासह सहकार, आरोग्य, महापालिका, पोलीस, महिला व बाल विकास, भूमापन आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.