संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कधीकाळी समारंभात जेवनाकरिता असलेल्या बैठकी पंगतीची प्रथा आता शहरासोबतच ग्रामीण भागातूनही हद्दपार झाली असून समारंभात खाली बसून बैठकी पंगतीत पानाची पत्रावळी,सहगोड आंबा,मुरब्बा हद्दपार झाला असून लग्नाच्या पंगतीत बफे नावाचा प्रकार रूढ झाल्यामुळे लग्न मंडपात टेबलावर ठेवलेल्या भांड्यातून पदार्थ हाताने घ्या, उभ्याने खा व घराले जा ,या प्रकारामुळे पंगतीची प्रथा आजच्या आधुनिक युगात पाहायला मिळत नाही मात्र एका समारंभात बैठकी पंगतीचे चित्र दिसल्याने खूप कौतुक वाटत होते.
पूर्वी एखाद्याच्या घरी लग्नकार्य असल्यास त्यांच्या घरी एक महिन्यापासून पाहुण्यांची वर्दळ सुरु व्हायची,लग्नाच्या एक दिवस घरासभोवताल हिरव्या दहाळीचे मांडव ,वऱ्हाड्यांच्या लांबच लांब जेवणाच्या पंक्ती ,पानाची पत्रावळ ,पानाच्या ड्रोन हे चित्र दुर्मिळच झाले आहे.आज बफेच्या जेवणात काही पदार्थ हमखास ठरलेले असतात त्यामुळे भात, पोळी,जीरादाळ दालफ्राय,गुलाबजामुन ,पापड,बेसन,बर्फी, दहिवडा व विविध प्रकारच्या भाज्या ठेवल्या जातात त्यामुळे सर्वच प्रकारचे पदार्थ ताटात ठेवून उभे राहून जेवण केले जाते .हे आपल्या आयुर्वेदाला अमान्य असले तरी आधुनिकतेच्या नावावर उभे राहून जेवण करण्याची पद्धत बफे प्रकारामुळे रूढ झाली आहे. त्यानंतर आईस्क्रीम ,नूडल्स पाणीपुरी अशाठिकानी तरुण तरुणीची गर्दी पाहायला मिळते आजच्या आधुनिक युगात एकंदरीत समारंभात जेवणाची पद्धत पूर्णपणे बदलून गेली आहे.आजही एखाद्या गावखेड्यात लग्नसमारंभात जेवणाकरिता वाढलेल्या पंक्ती बसल्या नंतर पानाची पत्रावळ ,गोड आंबा व अन्य पूर्वीचे पदार्थ आजही वयोवृद्धाना बफे पंक्तीत जेवण करताना आठवत असतात.