साहेब!……आम्हाला पट्टे वाटप कधी कराल जी?

संदीप बलविर,प्रतिनिधी

– हनुमान नगर वासीयांचे नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन

– आदीवासी अधिकार राष्ट्रीय मंच कडून नागरपरिषदेकडे विविध मागण्या करिता निवेदन

नागपूर :- बुटीबोरी येथील हनुमान नगर वासियांना ते राहत असलेल्या घराचे मालकी पट्टे देण्यात यावे, हनुमान नगर वसाहतीत नागरी सुविधा प्रदान करण्यात याव्या, बुटीबोरीतून हनुमान नगरकडे येण्याच्या रेल्वे मार्गावर फाटक लावण्यात यावे आदी मागण्यांना घेऊन आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या वतीने सोमवार दि १२ डिसें ला बुटीबोरी नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

विशेष बाब अशी की,मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात बुटीबोरी नगरपरिषदेने मालकी पट्ट्याचा ठराव मंजूर करूनही त्याचा पाठपुरावा केला नाही. या ठरावाचे अनुषंगाने नगरपरिषदेने नमूद केल्यानुसार मालकी पट्टे न दिल्याने त्या भागात शासकीय योजना राबवता येत नाही असे स्पष्ट लिहिलेले आहे. यापूर्वी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या वतीने अनेकदा बुटीबोरी नगरपरिषदेला निवेदने देण्यात आली, आंदोलने करण्यात आली. परंतु अजूनही नगरपरिषदेणे संबंधित बाबींवर दखल घेतली नसल्यामूळे हनुमान नगर वासीयांमध्ये आक्रोश दिसून आला.

या धरणे आंदोलनाला आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे संयोजक अमोल धुर्वे, कैलास मडावी अशोक आत्राम यांनी संबोधित केले. अखिल भारतीय किसान सभेचे उपाध्यक्ष अरुण लाटकर यांनी आंदोलनकर्त्याना संबोधित करताना भारतीय संविधान एका बाजूला अधिकार प्रदान करत असताना नगरपरिषद मात्र गरीब श्रीमंत भेदभाव करीत असल्याचा आरोप केला. आंदोलनानंतर हनुमान नगर मधील कार्यकर्ते कैलास मडावी यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यीय प्रतिनिधी मंडळांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे व नगराध्यक्ष बबलू गौतम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी पुरुषोत्तम पाजरे,मारुती नेवारे, संजय भूमरकर,नंदेश वाघमारे,पंजाब पुरके,गणेश इचकाटेसह जवळपास शेकडो नागरिक आंदोलनात उपस्थित होते.

यावर मुख्याधिकाऱ्यांनी याच आठवड्यात हनुमान नगर भागाची पाहणी करून विकासाची कामे समोर मिळण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे आश्वासन दिल्याचे संयोजकांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्पमित्राने दिले ६ फुटाच्या अजगराला जीवनदान

Tue Dec 13 , 2022
संदीप बलविर ,प्रतिनिधी नागपूर :- बुट्टीबोरी औधोगिक क्षेत्रामधील विदर्भ इंडस्ट्रीज प्रायवेट लिमी कंपनी मध्ये सोमवार दि १२ डिसें ला सायं ६:३० वाजताच्या जवळपास ६ फुटाचा अजगर आढळुन आला. साप हा प्राणी अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. एकीकडे सापाला शेतकर्‍याचा मित्र समजला जातो तर दुसरीकडे ६ फूट लांबीचा अजगर साप समोर दिसताच माणसाच्या हृदयाचे ठोके बंद पडतात.अशा परिस्थितीत विदर्भ इंडस्ट्रीज कंपनीत सायंकाळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com