संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नातीनच्या लग्न कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी टाकळघाटला गेलेल्या कामठी येथील त्रिमूर्ती नगर,रणाळा रहिवासी कुटुंबियांचे घर फोडत अज्ञात चोरट्यानी चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असे एकूण मिळून 47 हजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 30 जून ते 2 जुलै दरम्यान घडली असून यासंदर्भात नवीन कामठी पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध नव्याने लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता नुसार कलम 331(3),331(4),305 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ईश्वर मुळे वय 68 वर्षे रा त्रिमूर्ती नगर,रणाळा कामठी ने स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून नातीनच्या लग्न कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कुटुंबासह टाकळघाट येथे गेले असता 30 जून ला दुपारी 1 दरम्यान घराला कुलूप लावून गेले होते .2 जून ला घरी परतले असता यावेळी त्यांना घरचा दाराचे कुलूप तुटलेला दिसला .घरात जाऊन पाहणी केल्यावर हॉल च्या शोकेस मध्ये ठेवलेले नगदी 45 हजार रुपये व 17 ग्राम चांदीचे दागिने किमती 2 हजार रुपये असा एकूण 47 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरिला गेल्याचे दिसून आले .यासंदर्भात नवीन कामठी पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.