– आकाश राऊत
खापरखेड़ा – सिल्लेवाडा येथे कोळशाचा मोठं-मोठ्या खाणी असून हा रस्ता वेकोली प्रशासनाच्या अधिपत्याखाली येत असल्यामुळे रस्त्याची देख भाल ही वेकोली प्रशासनाची जबाबदारी आहे. नुकताच नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या सिल्लेवाडा (पोटा) चनकापूर सिमेंट रस्त्यावर मोठं मोठी खड्डे पडल्यामुळे नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे पडून अनेक जण जखमी होऊन दिव्यांगत्व झाले आहे. तसेच मागील २ महिण्यापासून रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत, मात्र वेकोली अधिकारी कुंभ करणी झोपेत आहे.
खापरखेडा वरून सिल्लेवाडा हे गाव पाच किलोमीटर अंतरावर आहे. खापरखेडा येथे वीज निर्मिती केंद्र, मुख्य बाजारपेठ, शाळा, संस्था, शासकीय-निमशासकीय कार्यालय असल्यामुळे सिल्लेवाडा, पोटा, चनकापूर येथील विद्यार्थी, महिला, कामगार, नागरिकांना कोणत्याही कामा करिता खापरखेडा येथे या रस्त्याने जाणे येणे करावे लागते. या रस्त्यावरती बियर बार, देशी दारू चे दुकान असल्यामुळे दारुड्या लोकांनाचा नेहमी या रस्त्यावर वावर असतो. त्यामुळे लहान मूल मुली, महिला सर्वसामान्य नागरिक रात्री उशिरा या रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळतात. रस्त्यावर पथदिवे नसल्याने नागरिकांना रात्री प्रवास करायला भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा लवकरात लवकर रस्त्यावरील बंद असलेली पथदिवे सुरू करण्यात यावी तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी सिल्लेवाडा पोटा येथील नागरिकांनी केली आहे.
सिल्लेवाडा, चनकापूर व वलनी हा भाग नागपूर जिल्ह्यात अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. अनेकदा या रस्त्यावर लूटमार, मारहाणीचे प्रकार घडले आहे.