भारतीय नौदलात वैमानिक म्हणून निवड झालेल्या सिद्धी दुबे हिचा सुरेश भोयर यांच्या हस्ते सत्कार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील येरखेडा ग्रामपंचायत हद्दीतील भूषण नगर येथील रहिवासी सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर नंदकिशोर दुबे यांची नात सिद्धी हेमंत दुबे या युवतीने लष्करात वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. सिद्धी हेमंत दुबे हिची भारतीय नौदलात वैमानिक म्हणून निवड झाली आहे. त्याप्रित्यार्थ नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी रविवार (ता.११) रोजी भूषण नगर येरखेडा येथे त्यांच्या निवासस्थानी जावून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भारतीय संविधान देवून गौरविण्यात आले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी येरखेडा ग्रामपंचायत सरपंच सरीता रंगारी, राजयोगिनी  प्रेमलता दीदी, ग्रा. प. सदस्य सतिश दहाट, मो. इमरान नईम, नाजिष परवीन, अर्चना सोनेकर, नसरूभाई, सचिन भोयर यांनी सिद्धी यांचे अभिनंदन केले यावेळी सिद्धीचे कुटुंबिय आजोबा नंदकिशोर दुबे, हेमंत दुबे, आनंद दुबे यांच्यासह प्रभुजी बिरबल, भाऊराव सुखदेवे, विनायक मंडपे, नितीन बेलेकर, विजय मंडपे, संगीता शर्मा, रमाकांत कुळकर्णी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिद्धी नागपूरच्या रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. तिची दोनदा भारतीय सैन्यदलात निवड झाली होती. पण तिने ‘इंडियन नेव्ही एव्हीएशन’ला प्राधान्य दिले. तर सिद्धीच्या परिवारातील वडील हेमंत दुबे भारतीय वायुसेना मध्ये १७ वर्ष सेवा करून निवृत्त झाले असून आजोबा नंदकिशोर दुबे सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर आहेत. सेनेशी संबंधित असलेल्या तिच्या कुटुंबासोबत तिने कामठीचे सुद्धा नाव मोठे केले असल्याची प्रतिक्रिया नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दिल्लीत लोकशाही चा गळा घोटू पाहणाऱ्या मोदी सरकारचा आप नागपूर कडून निषेध..

Sun Jun 11 , 2023
दिल्लीतील मतदारांचा अनादर करणाऱ्या भाजप सरकारच्या अध्यादेशाचा निषेध नागपुर – आम आदमी पार्टी नागपूर द्वारे आज दिनांक 11/6/2023 रोजी केंद्र सरकारच्या लोकतंत्र विरोधी काळ्या अध्यादेशाच्या विरोधात बाईक रॅली काढण्यात आली. ही महा रॅली देवेंद्र वानखडे व जगजीत सिंग यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. यावेळी प्रामुख्याने नागपूर संयोजक कविता सिंगल, संघटन मंत्री शंकर इंगोले, उपाध्यक्ष डॉ शाहिद अली जाफरी, सचिव भूषण ढाकुलकर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com