संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आई आणि वडील दोघेही सीकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यामुळे त्यांच्या अपत्यांना हा सिकलसेल चा आजार होतो त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक अथवा ग्रस्त व्यक्तीने आपापसात विवाह करणे टाळावे.भावी पिढीला सिकलसेल होऊ नये म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर दोघांनीही सिकलसेल रक्ताची तपासनी करावी व सिकलसेल अपत्य जन्माला येऊ देण्याचे टाळावे असे आव्हान नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीकारी डॉ शबनम खाणुनी यांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे राष्ट्रीय नागरी प्राथमिक आरोग्य अभियान कामठी तालुका अंतर्गत तालुका आरोग्य विभाग, शासकीय उपजिल्हा रुग्णालय तसेच नागरी प्रथमिक आरोग्य केंद्र च्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह कार्यक्रम च्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम कामठी शहरात यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे.सद्यस्थितीत सिकलसेल सोल्युबीटी चाचणी मोफत केली जात आहे.ही चाचणी पॉजिटिव्ह असल्यास हिमोग्लोबिन एलेक्ट्रोफॉरेसिस चाचणी केली जाते त्यावरून रुग्ण ग्रस्त आहे की वाहक आहे त्यावरून आलेल्या लक्षणांवरून औषधी दिले जाते .वाहक रुग्णाला पिवळे कार्ड तर ग्रस्त रुग्णाला लाल कार्ड देण्यात येते.निरोगी व्यक्तीला पांढरे कार्ड दिले जाते.म्हणून पिवळे-पिवळे,लाल -लाल,पिवळे-लाल कार्ड व्यक्तींनी विवाह करू नका त्यांनी पांढरे कार्ड व्यक्तीशी विवाह करा जेणे करून सिकलसेल ग्रस्त पिढी निर्माण होणार नाही.
राष्ट्रीय आरोग्य अभियान सिकलसेल आजार व नियंत्रण कार्यकम अंतर्गत आयोजित जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन प्रसंगी बोलत होते. तसेच सिकलसेल रुग्णाकरिता इतर शासकीय सुविधा असुन संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 1000 रुपयांची मदत, महात्मा फुले जिवनदायो योजनेचा लाभ, सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेच्यााावेळी प्रति तास 20 मिनिटे अतिरिक्त वेळ, महाविद्यालयीन तसेच बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी लेखनिकाची मदत , उपचारादरम्यान सिकलसेल रुग्ण व त्याच्या एका मदतनीसास मोफत एसटी प्रवास अशा सुविधा असल्याचे माहितीसुद्धा दिली.
या जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन कार्यक्रमात 36 विवाहित जोडप्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली तसेच अंगणवाडी केंद्रात 47 तरुण मुला मुलीनी सिकलसेल तपासणी करून घेतले.
या जागतिक सिकलसेल दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी,प्रियंकाजागीं,स्वीटी रामटेके,रश्मी,सुमित्रा वाघधरे,रंजना कौरती,सुषमा दिवानजी, ज्योती धनगर, स्वाती भवसागर,नीलम खोब्रागडे, सीमा नगरारे,सुनीता तिजारे,सत्यप्रभा मेंढे आदींनी मोलाची आरोग्य सेवा पुरविली.