अमृत अंतर्गत बांधलेल्या नवीन प्रतापनगर जलकुंभाच्या’ आंतरजोडणी करिता ऑक्टोबर  १३ ला शटडाऊन

– २४ तास शट डाऊन  : प्रतापनगर जलकुंभाचा पाणीपुरवठा राहणार बाधित

नागपूर :- नागपूर महानगर पालिकेने अमृत योजनेअंतर्गत नवीन बांधलेल्या शांतिनिकेतन कॉलोनी स्थित प्रताप नगर जलकुंभ (लक्ष्मी नगर  झोन-) ह्यांचे मुख्य जलवाहिनीला आंतरजोडणी करिता ऑक्टोबर १३ (शुक्रवार ) सकाळी ९  ते ऑक्टोबर १४ (शनिवार ) सकाळी ९ पर्यंत प्रतापनगर जलकुंभाचे (विद्याविहार कॉलोनी) शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे .  नवीन प्रताप नगर जलकुंभ  ६००x ६०० मी मी व्यासाच्या आंतरजोडणी करिता २४ तासांचा  चा तांत्रिक  शटडाऊन अपेक्षित आहे.

ह्या कामादरम्यान ऑक्टोबर १३ (शुक्रवार ) सकाळी ९  ते ऑक्टोबर १४ (शनिवार ) सकाळी ९ पर्यंत प्रतापनगर जलकुंभाचा पाणीपुरवठा बाधीत राहील तसेच तांत्रिक काम आटोपल्यावर  बाधित भागामध्ये पाणीपुरवठा १४ तारखेला संध्याकाळी पूर्ववत होईल

*ह्या  शटडाऊनमुळे  पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग*

*लक्ष्मी नगर झोन : प्रताप नगर जलकुंभ*  :  राणा प्रताप नगर, टेलिकॉम नगर, स्वावलंबी नगर, दीनदयाळ नगर, लोकसेवा नगर, अग्ने  ले आउट, पायोनियर सोसायटी, त्रिशरण नगर, जीवनछाया नगर, संचयनी  वसाहत, पूनम विहार, स्वरूप नगर , हावरे ले आउट, अशोक कॉलोनी, शास्त्री ले आउट, मालवीय नगर, गणेश कॉलोनी, एस इ  रेल्वे कॉलोनी, शांती निकेतन कॉलोनी, रामकृष्ण नगर, मिलिंद नगर, गौतम नगर, शिव  नगर, श्याम नगर, खामला  जुनी वस्ती, चांगदेव  नगर, सिंधी कॉलोनी, वेंकटेश नगर , कोतवाल नगर आणि नजीकचा परिसर

मनपा-OCW यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. या काळात टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.

अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एचडीएफसी बैंक मध्य भारत और महाराष्ट्र में मेगा कार लोन मेला आयोजित करेगा

Thu Oct 12 , 2023
• कार डीलर 1100 से अधिक बैंक शाखाओं में अपने नवीनतम मॉडल प्रदर्शित करेंगे मुंबई :- भारत का अग्रणी निजी क्षेत्र का बैंक, एचडीएफसी बैंक, मध्य भारत और महाराष्ट्र में दो दिवसीय मेगा कार ऋण मेला आयोजित करने जा रहा है। मध्य भारत में इंदौर, भोपाल, जबलपुर, ग्वालियर, रायपुर, जयपुर, उदयपुर, जोधपुर और जैसलमेर और महाराष्ट्र में मुंबई, पुणे, कोल्हापुर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!