संदीप बलविर, प्रतिनिधी
चुरशीच्या सामन्यात निसटत्या फरकाने ओम अमर क्रीडा मंडळ पराभूत
नागपूर :- तालुक्यातील सातगाव येथे धर्मवीर संभाजी बहुउद्देशीय संस्था द्वारा आयोजित “छत्रपती संभाजी चषक” खुल्या कब्बडी स्पर्धेत सातगाव येथील श्रीकृष्ण क्रीडा मंडळ ने चुरशीच्या सामन्यात निसटत्या फरकाने ओम अमर क्रीडा मंडळ,सातगाव या संघावर विजय संपादित करून छत्रपती संभाजी चषकावर आपले नाव कोरले.
सातगाव येथे गत दहा वर्षांपासून कब्बडीचे भव्य आयोजन केले जात असून सरपंच योगेश सातपुते हे ग्रामीण भागातील खेळाडूंना अंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्तम असे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे.या स्पर्धेत विदर्भातील एकूण ३६ संघांनी आपला सहभाग नोंदविला होता.त्यापैकी श्रीकृष्ण क्रीडा मंडळ,सातगाव व ओम अमर क्रीडा मंडळ,सातगाव यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात ३६-३४ अशा दोन गुणांच्या फरकाने श्रीकृष्ण क्रीडा मंडळने निसटता विजय संपादन करून कबड्डीच्या छत्रपती संभाजी चषकावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेतील प्रथम पुरस्कार ४१ हजार रुपये राजकुमारी रॉय कडून,द्वितीय पुरस्कार ३१ हजार रुपये माणिकराव मुरस्कार यांचेकडून,तृतीय पुरस्कार २१ हजार रुपये सखुबाई डोईफोडे स्मृती प्रित्यर्थ सुरेश डोईफोडे यांचेकडून तर चतुर्थ पुरस्कार ११ हजार रुपये प्रकाश घायवट यांचेकडून विजेत्या व उपविजेत्या संघाना देण्यात आले.या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्रीकांत होंडा सर्व्हिसेस तर चतुर्थ पुरस्कार युवक क्रीडा मंडळ,वारंगा या संघाने पटकाविले. माजी मंत्री व आमदार सुनील केदार, पदवीधर मतदार संघाचे आमदार ऍड अभिजित वंजारी,माजी मंत्री रमेशचंद्र बंग,जी प सदस्य दिनेश बंग,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अहमदबाबू शेख,उपसभापती प्रकाश नागपुरे, बबनराव आव्हाळे, वामनराव सातपुते,सुधाकर धामंदे,राजू हाते, गजानन माहुलकर,तुळशीराम झाडे,सागर जैस्वाल,उपसरपंच प्रविना शेळके, ब्रिजकिशोर मौर्य, यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना पुरस्कार वितरण करण्यात आले.यावेळी स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून जावेद पठाण यांना फ्रीज, शेवटच्या सामन्याचा मानकरी आशिष विश्वास यांना एल इ डी टीव्ही,उत्कृष्ट चढाई करिता आकाश चव्हाण,उत्कृष्ठ पकड विशाल यांना मोबाईल,सायकल आदी पारितोषिक देण्यात आले.या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन सातगाव ग्रा प चे सरपंच योगेश सातपुते यांनी तर स्पर्धेचे नियोजन अनुप आवारी यांनी केले.स्पर्धेच्या यशस्वीतेकरीता गणेश झाडे,नरेश गोडघाटे,सुरेश ठावरे, अशोक पिंपळकर, प्रशांत काटले, प्रवीण महाकुलकर, कमलाकर तुरणकर, यादव चकोले,राहुल कैकाडी,डोमा वाटकर, कैलास वाकुलकर,सतीश शेळके,शुभम नागपुरे,मंगेश झोडे, शशिकांत तिजारे व रवी सखे आदींनी परिश्रम घेतले.