– दि. 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत
नागपूर :- श्री गणेश जयंती निमित्य याही वर्षी दि. 31 जानेवारी 2025 रोजी, गणेश यागाचे आयोजन वेदमूर्ती आचार्य आशुतोष जोशी पं.संदीप शर्मा, पं.संकेत देशमूख, पं. यज्ञेश दिक्षित यांच्या पौरोहित्या खाली करण्यात येणार आहे. गणेश यागाचे प्रमुख यजमान व प्रफुल्ल वैद्य असून दि. 31 जानेवारी रोजी सकाळी 9 वा. गणेश यागात श्री गणेश पूजन व नवग्रह पूजन, वास्तू पूजन होऊन गणेश यागाच्या हवनास सुरूवात होईल व दि.1 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वा. श्री गणेश यागाची पुर्णाहुती होईल. याप्रसंगी मध्य नागपूरचे आमदार प्रविण दटके यांच्या तर्फे “श्री ना फुलांची आकर्षक शेज करण्यात येणार आहे. तसेच मंदिरातर्फे तीळाच्या रेवडीचे प्रसाद वितरण करण्यात येईल. दरवर्षी प्रमाणे मंदिरा तर्फे भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आलेले असून यांत भक्तांचा उत्स्फुर्त सहभाग व सहकार्य असते. या निमित्य शोभा यात्रा समितीचे गठण करण्यात आले आहे. ही शोभायात्रा सांयकाळी 5 वा. गणेश मंदिरातून निघेल. मानस चौकातून अन्सारी रोड, राजस्थानी महीला मंडळ पासून मॉरेस कॉलेज टि पाईंट ते व्हेरायटी चौक, सिताबर्डी मेन रोड, लोखंडी पूल ते मानस चौक मार्गे श्री गणेश मंदिर येथे रात्री 8 वाजता. विसर्जित होईल. श्री गणेश जयंती निमित्य शोभायात्रेत भव्य “श्री” चा रथ व आकर्षक झॉकी घोडा, बॅन्ड, ढोलताशा पथक, विद्युत रोषनाई, तसेच मंगल कलश पथकाचे आयोजन केले आहे. बर्डी मेन रोड वरील व्यापारी वर्गाचे सहकार्य असते. तसेच महाराज बाग प्रभात मित्र मंडळ तर्फे सकाळी 7:30 वाजता.
प्रसाद वितरण राहील. श्री गणेश मंदिरा तर्फे गणेश जयंती निमित्य रविवार दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1 ते 4 पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांनी अवश्य प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारीणी मंडळातर्फे करण्यात येत आहे.
– कार्यकारीणी मंडळ
अध्यक्ष श्रीराम बी.कुळकर्णी, उपाध्यक्ष अरूण जी.व्यास, सचिव दिलीप शहाकार, सहसचिव सुनिल एस.अग्निहोत्री, कोषाध्यक्ष हरी लक्ष्मण भालेराव, विश्वस्त अरूण कुळकर्णी लखीचंद ढोबळे, के सी गांधी, माधव कोहळे, प्रल्हाद पराते, अविनाश जावडेकर,
– शोभायात्रा मंडळ
विकास लिमये, सुरेश अग्रवाल, मनोज साबळे, राजेश भालेराव, अनिल मोटघरे, प्रविण माने, मितेश खत्री, दिलीप वंजारी, देवेंद्र दहेरीया, सुधा बैस्वारे, जय जोशी, पी.के.मद्रे, निखीलेश मिश्रा, करण उईके, हरीश शेवाळे, श्रीमती. शशी तिवारी, जयश्री गारसे अँड. शांतीकुमार शर्मा व इतर भक्तगणं जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहावे.