कांद्री परिसरात श्री दत्त पालखी शोभायात्रे ने गाव भ्रमण करण्यात आले.
कन्हान : – कांद्री येथील श्री दत्त मंदिरात दरवर्षी श्री दत्त जयंती महोत्सव साजरा केला जातो. परंतु मागील दोन वर्षापासुन शहरात व परिसरात कोरोनाचा प्रार्दु भाव असल्याने श्री दत्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला नसल्याने या वर्षी दोन दिवसी य कार्यक्रमाने कांद्री येथे श्री दत्त जयंती महोत्सव विविध कार्यक्रमाने थाटात साजरा करण्यात आला.
कांद्री-कन्हान परिसरातील श्री दत्त मंदिरात शनिवार दि.१८ ते १९ डिसेंबर असे दोन दिवसीय श्री दत्त जयंती महोत्सवाचे आयोजन करून शनिवार (दि. १८) डिसेंबर ला श्री दत्त जयंती निमित्य सकाळी १० वाजता घटस्थापना व आरती करून महोत्सवाची सुरू वात करण्यात आली. दुपारी १ वाजता रामायण पाठ सायंकाळी ४ वाजता परिसरात श्री दत्त पालखी सह शोभायात्रा काढुन गाव भ्रमण करण्यात आले. यावेळी नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर नरेश पोटभरे परिवारा तर्फे शोभायात्रेचे फुलाच्या वर्षाने जोरदार स्वागत करित श्री दत्त प्रभु यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पि त केले. त्यानंतर शोभायात्रा धन्यवाद गेट नी हनुमान मंदिर कडे गेली असता अनेक महिलांनी विविध पुजा अर्चना करून स्वागत केले. शोभायात्रा संपुर्ण परिसरा तील भ्रमण करून श्री दत्त मंदिरात पोहचली असता रात्री ७ वाजता आरती करून प्रसाद वाटप करून भजन किर्तनाचा कार्यक्रम करण्यात आला. रविवार (दि.१९) डिसेंबर ला दुपारी २ वाजता कांद्री श्री दत्त मंदिरात भजन कीर्तन कार्यक्रमाने दहीकाल्यांचा प्रसा द परिसरातील भाविकाना वितरण करून सायंकाळी बाल गोपालांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून श्री दत्त जयंती महोत्सव उत्साहात थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी नरेश पोटभरे, कवडु जी आखरे, पुरूषोत्तम वझे, बंडुजी बानवकुळे, रंगराव पोटभरे, रामाजी हिवरकर, शिवाजी चकोले, बाळाजी सरोदे, उषाबाई वंजारी, शोभाताई वझे, कांताबाई ठाकरे, इंदिरा बाई, सुनिता हिवरकर, रामजी हिवरकर , मारोती कुंभलकर, मुरलीधर कामडे, श्रीराम कामडे, राजहंस वंजारी, गणेश भक्ते, नितेश कामडे सह परिस रातील सर्व आयोजक, महिला व नागरिकांनी उपस्थित राहुन महोत्सवास सहकार्य केले.