नागपूर :- फुटाळा तलावावरील म्युझिकल फाउंटन मध्ये सांगितलेल्या स्क्रिप्ट मध्ये बाबासाहेबांच्या धम्मदीक्षा संदर्भात चुकीचा इतिहास सांगितला जात आहे, त्याचप्रमाणे या स्क्रिप्ट मध्ये अनेक चूका आहेत त्या दुरुस्त करण्या संदर्भात बसपाने एन आय टी चे सभापती सूर्यवंशी, जिल्हाधिकारी ईटणकर व खासदार गडकरी यांना यापूर्वीच निवेदने दिलेली आहेत.
सूर्यवंशी यांनी हेरिटेज कमेटी च्या बैठकीत त्यावर निर्णय घेणार असल्याचे व बसपाला निमंत्रित करण्याचे आश्वासन दिले असताना त्यातील चुकांची दुरुस्ती न करता अनिल सोले च्या माध्यमातून आजपासून पुन्हा म्युझिकल फाउंटन सुरू करण्यात येत असल्याची बातमी आहे.
त्यामुळे बसपा ने त्यात दुरुस्ती केल्याशिवाय फाउंटन मध्ये तो इतिहास सांगू नये, अन्यथा गोंधळ घातल्याशिवाय, आयोजकांचा मुर्दाबाद केल्याशिवाय त्याची दखल घेतली जाणार नाही काय? असा संतप्त प्रश्न बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी शासन प्रशासनाला केलेला आहे.
आज फोनवर कोणताही अधिकारी उपलब्ध न झाल्याने त्याचे संबंधित कागदपत्रे, निवेदने व मॅसेज पुन्हा व्हाट्सअपवर पाठवलेली आहेत.