– 62 हजारांची नगदीचोरट्यांनी मारला डल्ला एन, एच69मेन रोडवर, चोरट्यांचा, दरोडेखोरांचा, गावगूंडाचा असतो वावर
महादुला :- एन, एघ 69 च्या सर्विसरोड,महहादुला गावाकडे जाणार्या रोडवर, प्रो, पा-महेंद्र गुप्ता यांचे होलसेल मिठाईचे दूकान आहे, दिं, 17 डिसेंबरला,कडाक्याचे थंडीत पहाटे 5़,00वाजता रस्तावर कुणीही नसतांनी दुकानाचे समोरचे लोखंडी पत्रयाचे शेड हलकेसे वर करून दुकानात प्रवेश करून गल्यातील जमा62000रू वर डल्ला मारल्याची, धक्कादायक बाब समोर आली आहे, त्यामुळे किराणा दुकानदारांमध्ये, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपुर -छिंदवाडा, नँशनल हायवे69 कोराडी महादुला टी-पाँंइंट वर अंडरपास खाली रात्रीचेवेली असामाजिक, गावगूंड दारु प्रासन करून मोठ्याप्रमाणात गर्दी करतात त्यामुळे सर्विस रोड ने वाहतुक करणारे महानिर्मिती कंपनीचे, नौकरदारवर्ग, कंत्राटीपध्दतीने कामकरणारे कामगार, शालाकाँलैज मध्ये जाणार्यांना यांचा प्रचंड मनस्ताप शोसावा लागतो आहे.
रात्रीचेवेली पोलिस प्रशासनाने या बाबीची गंभीरपणे दखल घेणे गरजेचे आहे, मागील काही दिवसापूर्वी तीक्ष्ण हत्याराने एकाला भोसकल्याची घटना देखील ताजी आहे कोराडी पोलीस स्टेशन ने महादूला-कोराडी एन एच 69वर खास करूनमहादूला टि-पाँंईट वर दररोज अतिरिक्त पोलीस ची ड्यूटी लावावी जेणेकरुन चोर, गूंड, मवाली, यांचेवर अंकुश ठेवणे आवश्यक होईल, असे येथील सूजान नागरीकांचे मत आहे।
आज पहाटे झालेल्या धाडशी चोरीच्या तपासाकरीता पो, स्टे, चे पीएसआय केंद्रे, ए, एस, आय खोब्रागडे यांची तसेच काँन्सटेबल गुलाब मरकाम अधिक तपास करीत आहेत।