नागपूर :- राजे छत्रपती प्रतिष्ठान च्यावतीने 6 जून रोजी दत्तात्रय नगर / सक्करदरा / तलावा समोर लक्ष्मीनारायण मंदिर परिसर नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा गुरुवार दि. 6 जून 2024 रोजी सायंकाळी ५ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आले असून यावेळी 51 मिनिटांत मातीच्या शिवनेरी किल्ला प्रतिकृती बनविण्याचा प्रयत्न राजे छत्रपती प्रतिष्ठान तर्फे आयोजित अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात करणार आहे.
कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमंत राजे डॉ. मुधोजी महाराज भोसले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या उपस्थितीत याप्रसंगी शिवकार्य करणाऱ्या 51 मावळ्यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. तसेच 51 मिनिटात शिवनेरी किल्ला प्रतिकृती बनविण्याचा उपक्रम अतुल गुरु व त्यांचा चेमू यांच्या वतीने हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक स्वप्निल वासुदेव कुंदेलवार आणि पायल स्वप्निल कुंदेलवार यांनी कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये ताज राज हिरा आखाडा, नवयुग ढोल ताशा पथक आणि शिव गोंधळ कार्यक्रमात सहभागी राहतील.
या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवात सगळ्यांनी हजर राहून या कार्यक्रमाला यशस्वी करण्याचे आवाहन केले असून पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना सांगितले. यावेळी उपस्थित सदस्य अतुल गुरु, धनजंय डेग्वेकर, हेमंत देशपांडे, पुष्कर जोध, प्रेम गैनेवार, समर भैसवारे, कृष्णा खंडाळकर, सोनू खुले, पंकज बोंन्दे , आनंद भोसले, रीत निंबाळकर, राहुल कोरके आणि सातफळे परिश्रम घेत आहे.