नागपूर् :- खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धेतील ज्यूनिअर्स पुरूषांच्या पहिल्या फेरीतील सामने गुरूवारी (ता.18) पार पडले. या स्पर्धेमध्ये रामटेक येथील शिवगर्जना क्रीडा मंडळ, नागपूरातील विक्रांत क्रीडा मंडळ आणि सप्तरंग क्रीडा मंडळाने विजयी सुरूवात केली.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे. गुरूवारच्या ज्यूनिअर्स पुरूषांच्या पहिल्या फेरीत शिवगर्जना रामटेक संघाने नागपूर व्यायाम शाळा संघाचा 45-24 असा तब्बल 21 गुणांनी एकतर्फी पराभव करीत दमदार सुरूवात केली. अन्य सामन्यांमध्ये विक्रांत क्रीडा मंडळ नागपूर संघाने पारडी येथील महाकाय क्रीडा मंडळाचा 41-13 असा 28 गुणांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. नागपुरातील सप्तरंग क्रीडा मंडळाने लखनपूर येथील आदिवासी क्रीडा मंडळाला 18 (34-16) गुणांनी मात दिली. एकलव्य क्रीडा मंडळ नागपूर संघाने चुरशीच्या लढतीत रामटेकच्या साईराम क्रीडा मंडळाला 38-30 असा गुणांनी पराभवाचा धक्का दिला.
निकाल (पहिली फेरी)
ज्यूनिअर्स पुरूष (20 वर्षाखालील)
1. शिवगर्जना रामटेक (45) मात नागपूर व्यायाम शाळा (24) – 21 गुणांनी विजयी
2. विक्रांत क्रीडा मंडळ नागपूर (41) मात महाकाय क्रीडा मंडळ पारडी (13) – 28 गुणांनी विजयी
3. सप्तरंग क्रीडा मंडळ नागपूर (34) मात आदिवासी क्रीडा मंडळ लखनापूर (16) – 18 गुणांनी विजयी
4. एकलव्य क्रीडा मंडळ नागपूर (38) मात साईराम क्रीडा मंडळ रामटेक (30) – 8 गुणांनी विजयी
5. एकलव्य सावनेर (36) मात जय बजरंग क्रीडा मंडळ अजनी (9) – 27 गुणांनी विजयी
6. साई स्पोर्ट्स क्लब मोरगाव (36) मात नेहरू बाल सदन हिंगणा (12) – 24 गुणांनी विजयी
7. श्री साई क्रीडा मंडळ नागपूर (36) मात रॉय इंग्रजी शाळा, गाडगेनगर (11) – 25 गुणांनी विजयी
8. नागसेन क्रीडा मंडळ कामठी (38) मात शिवमुद्रा क्रीडा मंडळ अंजनगाव (9) – 29 गुणांनी विजयी
9. जय दुर्गा क्रीडा मंडळ (41) मात आझाद क्रीडा मंडळ मानेगाव (35) – 6 गुणांनी विजयी
10. विशाल क्रीडा मंडळ नरखेड (25) मात नागपूर वॉरियर्स, नागपूर (7) – 18 गुणांनी विजयी