संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- विदर्भातील सर्वात मोठे शासकीय उपजिल्हा रुग्णालय म्हणून कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची ओळख आहे.या शासकीय रुग्णालयात तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील जवळपास एक हजारच्या आत नागरिक आरोग्य सेवेचा लाभ घेतात. या रुग्णालयात रुग्ण सेवा संदर्भात सर्व सुविधायुक्त एम्ब्युलेन्स ची अत्यंत आवश्यकता आहे तेव्हा या शासकीय रुग्णालयाला एक सर्व सुविधायुक्त एम्ब्युलेन्स देण्यात यावे तसेच उन्हाचा प्रकोप लक्षात घेता जवळपास 12 डेसर्ट कूलर देण्यात यावे अशी मागणी शिवसेना च्या वतीने कामठी मौदा विधानसभा उपजिल्हा प्रमुख राजन सिंह यांच्या नेतृत्वात राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना दिलेल्या सामूहिक निवेदनातून मागणी करण्यात आली तसेच रुग्णालयात दिवसेंदिवस वाढीवर असलेली रुग्णसंख्या लक्षात घेता या रुग्णालयाचा विस्तारि करण करण्याहेतू सर्व सुविधायुक्त आधुनिक पद्धतीचे शासकीय उपजिल्हा रुग्णालय इतरत्र हलवून सुसज्ज इमारत बांधून लोकोपयोगी आणण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली.
याप्रसंगी उमेश कातुरे, नितेश वांगे,आशीष जैन,श्यामली बागड़े ,कुणाल पिल्लै ,नरेश कनौजे,शिवम् ग्रावकर,संजय उइके, सुशील शेरेकर सह शिवसेना चे आदी पदाधिकारी व कार्यकर्तेगण उपस्थित होते.