मॉ काली मंदीरात पुजा अर्चना करून शिवसेना वर्धापन दिन होते साजरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- हिंदु हुदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे हयानी स्थापन केलेल्या प्रखर शिवसेना चा ५८ वा वर्धापन दिन सोहळा जय मॉ काली मंदीर सत्रापुर कन्हान येथे थाटात साजरा करण्यात आहे.

बुधवार (दि.१९) जुन ला हिंदु हुदय सम्राट स्व. मा. बाळासाहेब ठाकरे हयानी मराठी माणुस व प्रखर हिंदुत्वाची अस्मिता जपन्याकरिता १९ जुन १९६६ ला मुंबई येथे शिवसेनाची स्थपना करून एक सामाजिक चळवळ सुरू करून सर्वसामान्याच्या न्याय हक्काचा सेवाभावी लढा उभा केला. आज त्या सामाजिक व राजकिय रोपटयाचे वटवृक्ष होऊन महाराष्ट्र राज्यासह देशातील इतरही राज्यात शिवसेनेच्या शाखा स्थापना होऊन नावलौकिक प्राप्त झाला आहे.

यामुळे बुधवार (दि.१९) २०२४ ला सकाळी ११.३० वाजता सत्रापुर कन्हान येथील जय मॉ काली मंदीरात रामटेकचे माजी खासदार प्रकाश जाधव, माजी जिल्हाप्रमुख पांडुरंग बुराडे यांनी जय काली माता चरणी नमन, पुजा अर्चना करून शिवसेना (उबाठा) पक्षाची दिवसे दिवस प्रगती, उन्नती करिता प्रार्थना करून शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिवस थाटात साजरा करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे नरेश बर्वे, प्रा. अरूण वराडे, शिवसेना कुही तालुका प्रमुख प्रदिप कुल्लरकर, दिलीप राईकवार, कोठीराम चकोले, गुणवंत आंबागडे, मोतीराम रहाटे, गणेश भोंगाडे, इंदल यादव, नानाभाऊ मोहाडे, महेंद्र भुरे, युवराज ठवकर, कवडु चापले, बंटी हेटे, रूपेश सातपुते, मनोज गुडधे, देवा चतुर, राजन भिसे, रविंद्र चकोले, प्रतापसिंग राजपुत, अमोल सुटे, मुलचंद सातपैसे, गणेश ठवकर, आशिष वाढेकर सह शिवसेना (उबाठा) पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कचरा डम्पिंगमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका, मुख्याधिकाऱ्याला निवेदनातुन कचरा डम्पिंग बंद करण्याची मागणी

Thu Jun 20 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- ग्राम पंचायत कांद्रीची लोकसंख्या झपा ट्याने वाढत असल्याने नागरिकांच्या विकासाकरिता ग्राम पंचायत कांद्रीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. परंतु कचरा डम्पिंग ही रहिवाशी ठिकाणी होत असल्याने मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन नागरिकांनी रोष व्यक्त केलेला आहे. कांद्री नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी ओला कचरा आणि सुका कचराची विल्हेवाट करण्यासाठी गावाच्या शेजारी असलेला दुर्गा माता मंदिराच्या मागच्या बाजुला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!