संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात हिवताप व डेंग्यूची मोठ्या प्रमाणात साथ पसरली असून नागपूर जिल्ह्याची सर्वात मोठी ग्रामपंचायत मानल्या जाणाऱ्या येरखेडा गावात मागील काही दिवसात दोन तरुण मंडळीं डेंग्यूसदृश्य आजाराने बळी गेले तेव्हा या जीवितहानी ची पुनरावृत्ती न वहावी व ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर्याची भूमिका घेत डेंग्यू नियंत्रणासाठी नियोजनबद्ध पद्धतीने डेंग्यू नियंत्रण मोहीम राबवून ग्रामस्थांची काळजी घ्यावी या मागणीसाठी शिवसेनाच्या वतीने कामठी मौदा विधानसभा चे उपजिल्हा प्रमुख राजन सिंह यांच्या नेतृत्वात आज येरखेडा ग्रामपंचायत समोर नारे निदर्शने करण्यात आले.
याप्रसंगी कामठी तालुका प्रमुख उमेश कातूरे, युवासेना उप जिल्हा प्रमुख पवन शर्मा , माथाडी कामगार सेना उपजिल्हा प्रमुख शैलू यादव , कामठी तालुका प्रमुख शरद भुशणनवार रोहित बिल्लरवान, पोनु पिल्ले,नितेश चौहान ,राजू तूप्पट उप प्रमुख ,गणेश तुप्पट शहर प्रमुख, आकाश महल्ले ,शुभम तडसे युवा सेना शहर प्रमुख कामठी ,सौरभ गुप्ता उप प्रमुख,रिषभ उज्जैनवार उप प्रमुख, सोमू खरे, शिवम मिश्रा ,अमर केजरकर ,चिंटू पिल्ले ,ऋषि जरोंडे,प्रणय वाल्दे, रंजित यादव,पवन खडसे ,अमर गेडाम,योगेश चौहान,हर्ष जरोन्दे,विनीत मेहरोलिय, रितिक मेहरोलिया, अज्जु मेहरोलिया,मोहित मेहरोलिया, भैयू मेहरोलिया, लक्ष्मण जरोंदे,शुभम जिवने,आकाश चावर,राधा तूप्पट, श्यामली इत्यादि आनी शिवसेना चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.