रामटेक येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

– मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – आमदार आशिष जयस्वाल

रामटेक :- दि.२ जुलै रोजी गंगाभवन सभागृह रामटेक येथे रामटेक विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदु हृदसम्राट बाळासाहेब ठाकरे, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन उद्घाटन आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेना उप जिल्हाप्रमुख वर्धराज पिल्ले, युवासेना नागपूर जिल्हा प्रमुख राजेश गोमकाडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख कमलेश शरनांगत, जिल्हा नियोजन समिती सदस्य हर्षवर्धन नकोसे,शिवसेना रामटेक तालुका प्रमुख विवेक तूरक, शहर प्रमुख राजेश किंमतकर, शिवसेना वैद्यकिय नागपूर जिल्हा प्रमुख गौरव पनवेलकर, न. प.माजी सभापती बिकेंद्र महाजन,शिवसेना रामटेक तालुका महिला आघाडी प्रमुख रश्मी काठीकर, शिवसेना पारशिवणी तालुका प्रमुख राजु भोस्कर,उपतालुका प्रमुख प्रेम भोंडेकर,शहर प्रमुख राहुल ढगे,शिवसेना मौदा तालुका प्रमुख नितेश वांगे, प्रशांत भुरे, जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे,रामटेक पंचायत समिती सभापती चंद्रकांत कोडवते, कन्हान नगर परिषद अध्यक्ष करूना आस्टनकर, नागपूर शिवसेना शहर प्रमुख बंडु तलवेकर, माजी जि. प. सभापती नंदा लोहबरे,माजी नगराध्यक्ष नालिनि चौधरी, प्रतिभा कुंभालकर, भुमेश्र्वर चाफले, उपस्थित होते.

उपस्थीत कार्यकर्त्यांना संभोधतांनी आपल्या भाषणात आमदार ॲड आशिष जयस्वाल म्हणाले,” मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही ग्रामीण मार्ग व इतर मार्ग करीता बजेट मधून पैसे मिळत नव्हते. मला सांगायला आनंद वाटते की,आज ६०० कोटी पेक्षा जास्त रक्कम मी पांदण रस्त्याच्या डामरीकरणासाठी खर्च केले आहे. गावा – गावामध्ये डामरिकरणाचे काम सुरु झालेले आहे. त्यामध्ये आपला विधानसभा क्षेत्र महाराष्ट्रामध्ये नंबर एकवर आहे. हे सांगताना मला आनंद आणि अभिमान वाटते.नवीन रेशन कार्ड, अंतोदय कार्ड, आमदार आपल्या गावी मुक्कामी, आमदार कार्यलय गावी, प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना यामध्ये मी एक नंबरचे काम करत आहोत तसेच अनेक गोष्टींमध्ये आपण समोर आहोत.

शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याला रामटेक विधानसभा क्षेत्रातील तालुका रामटेक, पारशिवनी, मौदा येथिल माजी उपसभापती ज्ञानेश्वर चौरे,किरनताई धूर्वे, मिलिंद मेश्राम, युवासेना रामटेक शहर प्रमुख सौरभ सिंगनजुडे,युवासेना पारशिवनी शहर रोशन पिंपळामुळे, उपशहर प्रमुख विश्वास पाटील,विजय भुते, सुरेखा माकडे, सुंदरा खडसे सह सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अकीदत से मनाई बाबा ताजुद्दीन की छब्बीसवीं

Fri Jul 5 , 2024
नागपुर :- हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट की ओर से बुधवार को ताजाबाद में बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्लाह अलैह की छब्बीसवीं शरीफ अकीदत से मनाई गई. छब्बीसवीं के पावन अवसर पर हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट के चेयरमैन प्यारे जिया खान एवं सचिव ताज अहमद राजा सरपरस्ती में विभिन्न धार्मिक कार्यक्रम आयोजित किए गए. सुबह सर्वप्रथम ट्रस्ट ऑफिस से ट्रस्ट के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com