मुंबई – शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे ११ आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे अनेक आमदार हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. औरंगाबादमधील 6 आमदार हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, याच महिन्यात उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत विराट सभा घेतली होती.
एकनाथ शिंदे हे ११ आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे राज्यातील काही आमदार हे नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबर उस्मानाबादेतील शिवसेनेचे उमरगा लोहारा आमदार ज्ञानराज चौगुले हे नॉट रिचेबल आहे. आमदार चौगुले हे गेली ३ टर्म सलग सेनेचे आमदार असून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणून ओळख जातात. सलग 3 वेळा आमदार असतानाही मंत्रिपद न मिळाल्याने चौगुले नाराज होते. चौगुले यांचे दोन्ही नंबर बंद आहे?
तर बुलडाण्यातील मेहकरचे शिवसेना आमदार संजय रायमूलकर आणि बुलडाणाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड नॉट रिचेबल आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार नॉट रिचेबल आहेत.