शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर   

मुंबई : सन 2019-20,2020-21 व 2021-22 असे तीन वर्षांचे एकूण ११७ क्रीडा पुरस्कार क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज सेवासदन या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार सन २०१९-२० श्रीकांत शरदचंद्र वाड (ठाणे), सन २०२०-२१ दिलीप बळवंत वेंगसरकर आणि सन २०२१-२२ आदिल जहांगिर सुमारीवाला, (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे.

मंत्री महाजन म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

टायर चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक

Sat Jul 15 , 2023
– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई नागपूर :-फिर्यादी विशाल आनंद जांभुळकर, वय ४० वर्ष, रा १ प्लाट नं. ४१ सन्यालनगर टेकानाका नागपुर यांचे आयसर टैंकर १४ चक्का क्र. एम. एच. २२ ए.एन. १९६४ हा १५ दिवसापासून खराब झाल्याने कन्हान रिंग रोड हायवे इन हॉटेलचे मागे उभा केला असता दिनांक ३०/०६/२०२३ रोजी हॉटेल हायवे इनचे मालकाने फोन करून सांगीतले की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com