दिल्ली :- धनगर समाजाला खोटे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आली. शिंदे-फडणवीस सरकार धनगरांची फसवणूक करत आहे, असा आरोप करतानाच भाजपाने धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत केली.
आज लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. कालपर्यंत धनगरांना आरक्षण मिळायला हवे अशी शिंदे गटाच्या शिवसेनेची भूमिका होती.
परंतु आज त्यांचे मंत्री राजेंद्र गावित हे धनगरांना आरक्षण नको असे बोलत आहेत त्यामुळे शिंदे गटाची नेमकी धनगर आरक्षणाबाबत भूमिका काय? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
आम्ही कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करत नसून ते तसेच राहिले पाहिजे. इतरांना वेगळे आरक्षण देण्यात यावे, अशीच भूमिका आमच्या महाविकास आघाडीची आहे असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.