यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार प्रीतीसंगमावर

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा 40 वा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त शरद पवार यांनी कराडमधील प्रीतीसंगमावर जात अभिवादन केलं. यावेळी शरद पवार यांच्यासोबत रोहित पवार आणि निलेश लंके देखील होते. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रीतीसंगमावर सुरू असलेल्या भजन कार्यक्रम आयोजित केला आहे. शरद पवार आणि रोहित पवार हे देखील काही काळ स्थिरावले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केलं. पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीला देखील शरद पवार उपस्थित होते. वेणुताई चव्हाण हॉल या ठिकाणी छोटेखानी बैठक झाली.

फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं आहे. आपल्या आधुनिक विचारांनी पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी करणारे, महाराष्ट्राला कृषी, शिक्षण व औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर बनवण्यााठी बहुमोल योगदान देणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांना पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन!, असं शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय? कधी अन् कोणाचा होणार शपथविधी

Mon Nov 25 , 2024
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते? शपथविधी कधी होणार? कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार? मुख्यमंत्र्यांबरोबर कोण कोण शपथ घेणार? उपमुख्यमंत्री किती असणार? या प्रश्नांची उत्तरे मिळू लागली आहे. महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा उद्या सोमवारी होण्याची शक्यता आहे. त्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहे. हा सोहळा राजभवनात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!